सत्य पडताळणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तेज बहादूर निवडणुक लढविणार का?

True राजकीय | Political

सैन्याला मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाबद्दल आवाज उठवणाऱ्या  तेज बहादुर यादव या जवानाला सैन्यातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्याने आता मोदींविरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याची पोस्ट Save Maharashtra From BJP या पेजवरुन शेअर होत आहे. या पोस्टला 1 हजार 200 लाईक्स आहेत. यावर 122 कमेंट्स असून 537 जणांनी ती शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडो या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

मोदी यांच्या विरोधात बीएसएफमधून बडतर्फ करण्यात आलेले जवान तेज बहादूर हे निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त नवभारत टाईम्सने 30 मार्च 2019 रोजी दिले होते. वाराणसी येथून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे नवभारत टाईम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे. तेज बहादूरने स्वत: ही माहिती पत्रकारांना दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

टाईम्स नाऊ हिंदीनेही याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार तेज बहादुर हा अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणुक लढविणार आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने भ्रष्ट्राचाराविरोधात आवाज उठवला पण त्याला बरखास्त करण्यात आले.

आक्राईव्ह लिंक

एएनआय या वृत्तसंस्थेनेही याबाबतचे वृत्त दिले आहे.  

मोदी हे खरंच पुन्हा वाराणसीतुन निवडणुक लढविणार आहेत का? याचीही आम्ही पडताळणी केली. त्यावेळी आम्हाला खालील वृत्त आढळून आले. भाजप नेते जे. पी. नड्डा यांच्या हवाल्याने दिलेल्या द पायोनियरने या वृत्तात मोदी हे पुन्हा वाराणसीतून निवडणुक लढविणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

तेज बहादुर यादव हा निलंबित जवान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणुक लढविणार असल्याची पोस्ट फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत सत्य आढळली आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तेज बहादूर निवडणुक लढविणार का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: True