Fact check : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रात्रीपासून देशभर जाहीर केली दारु बंदी?

False राजकीय | Political

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुरचित्रवाणीवरुन आज मध्यरात्रीपासून संपूर्ण भारतात दारु बंदी असे सांगत असल्याची  पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरेच दारु बंदीची घोषणा केली आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटला भेट दिली. त्याठिकाणी असे काही दिसून आले नाही. आज तक, दुरदर्शन आणि अन्य कोणत्याही दुरचित्रवाणीच्या संकेतस्थळावरही असे वृत्त दिसून आले नाही.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुरचित्रवाणीवरुन आज मध्यरात्रीपासून संपूर्ण भारतात दारु बंदी असे सांगत असलेल्या या पोस्टमध्ये दुरचित्रवाणीवरील एक क्षण दाखवण्यात आला आहे. या टीव्ही ग्रॅबमध्ये सौजन्य डीडी असे म्हटलेले आहे. स्क्रीनच्या एका कोपऱ्यावर आज तक असे किचिंत फिकट केशरी रंगात लिहिलेला लोगो दिसत आहे. आज तकच्या लोगोखाली टीव्हीवर वेळ दिलेली असते ती सुध्दा या ठिकाणी दिसत नाही.

मग प्रश्न पडतो या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना दिसत आहे. ते छायाचित्र नेमके कधीचे आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबर 2016 रोजी दुरचित्रवाणीवरुन देशाला केलेले संबोधन पाहिले त्यावेळी आम्हाला युटूयूबवरील एनडीटीव्हीच्या व्हिडिओत हा टीव्ही ग्रॅब दिसून आला.

एनडीटीव्हीच्या युटूयब व्हिडिओतून पकडलेला एक क्षण

हा संपूर्ण व्हिडिओ आपण खाली दिलेल्या लिंकमध्ये पाहू शकता. एक मिनिट दहा सेकंदाला हा क्षण तुम्ही पाहू शकता.

निष्कर्ष

आज तक या वृत्तवाहिनीने आज मध्यरात्रीपासून संपूर्ण भारतात दारु बंदी असे कोणतेही वृत्त दिलेले नाही. सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांचे जुने छायाचित्र वापरुन मुळ बाबींमध्ये फेरफार करुन फोटोशॉप केलेला हा टीव्ही ग्रॅब पसरविण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact check : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रात्रीपासून देशभर जाहीर केली दारु बंदी?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False