
मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार उर्मिला मोहसीन अख्तर मीर यांच्या प्रचार मोहिमेत, काँग्रेसचे गुंडांनी केलं स्थानिक लोकांना मारहाण अशी एक पोस्ट सध्या आमची माती, आमची माणसं या पेजवरुन व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खरंच स्थानिकांना मारहाण केली का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे मुंबई उत्तर मतदारसंघातून उर्मिला मोहसीन अख्तर मीर या निवडणुक लढवित आहेत का? याची तपासणी करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम निवडणुक आयोगाच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर गेलो. या ठिकाणी शोध घेतला असता उर्मिला मोहसीन अख्तर मीर असे नाव आम्हाला दिसून आले नाही. याठिकाणी आम्हाला उर्मिला श्रीकांत मातोंडकर असे नाव आम्हाला दिसून आले.

त्यानंतर आम्ही खरंच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्थानिकांना मारहाण केली का, हे पाहण्यासाठी द हिंदूच्या संकेतस्थळावर गेलो. त्याठिकाणी उर्मिला मातोंडकर यांनी भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला रॅलीत गोंधळ घातल्याचे म्हटले आहे.

नेमकं काय घडलं याबद्दल उर्मिला मातोंडकर यांची प्रतिक्रियाही द हिंदूने प्रसिध्द केली आहे. ती आपण खाली पाहू शकता. या प्रतिक्रियेत त्यांनी some man म्हणजेच काही माणसे असे म्हटलेले आहे. स्थानिक माणसं असं म्हटलेलं नाही.

गोपाळ शेट्टी यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून यातही कुठेही स्थानिक युवक असे म्हटलेले नाही. बोरिवली स्थानकावरील युवक असे त्यांनी म्हटलेले आहे.

पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनीही यावर प्रतिक्रिया देताना ते नियमित प्रवासी होते असे म्हटले आहे. त्यांनी हे स्थानिक असल्याचे म्हटलेले नाही.

बोरिवली पोलिसांकडे उर्मिला मातोंडकर यांनी दिलेली फिर्याद आपण खाली वाचू शकता. महाराष्ट्रनामाच्या संकेतस्थळावर ही फिर्याद आहे.

या घटनेनंतर उर्मिला मातोंडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओही तुम्ही खाली पाहू शकता.
गोपाळ शेट्टी यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेतही कुठेही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्थानिकांना मारहाण केल्याचे म्हटले नसुन ते रेल्वे प्रवासी असल्याचे म्हटले आहे.
निष्कर्ष
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्थानिकांना मारहाण केल्याचा उल्लेख कुठेही आढळून येत नाही. काँग्रेसने हे भाजप कार्यकर्ते असल्याचे म्हटले आहे. बोरिवली पोलिसांनी आणि गोपाळ शेट्टी यांनी ते रेल्वे प्रवासी असल्याचे म्हटले आहे. कोणीही ते स्थानिक असल्याचे म्हटलेले नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट संमिश्र आढळली आहे.

Title:सत्य पडताळणी : मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांकडुन स्थानिकांना मारहाण?
Fact Check By: Dattatray GholapResult: Mixture
