
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 लाख पगारावर एक मेकअप आर्टिस्ट ठेवली असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निरज कुमार यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे तपासले असता असे असंख्य फोटो व्हायरल होत असल्याचे दिसून येते.
याबाबत अधिक पडताळणी केली असता यू टुयूबवर याबाबतचा एक व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे की ही महिला त्यांची मेकअप आर्टिस्ट नाही. ही महिला ‘मादाम तुसाद वॅक्स म्यूझियम’ची कर्मचारी आहे.
16 मार्च 2016 रोजी 7, लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली या ठिकाणी पंतप्रधानांच्या निवासस्थानी ‘मादाम तुसाद वॅक्स म्यूझियम’चे कर्मचारी आले होते. हे सगळे कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेणाचा पुतळा बनविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आले होते. खाली देण्यात आलेली छायाचित्रे त्याच वेळी घेण्यात आलेली आहेत.
‘मादाम तुसाद वॅक्स म्यूझियम’ हे लंडनमधील एक प्रसिध्द संग्रहालय आहे. या संग्रहालयात जगविख्यात व्यक्तीचे मेणाचे पुतळे बनविण्यात येतात. हे पुतळे प्रदर्शनात ठेवण्यात येतात. ‘मादाम तुसाद वॅक्स म्यूझियम’च्या शाखा जगभरातील 23 शहरांमध्ये आहेत.
याबाबतचे वृत्त अनेक वृतवाहिन्यांनी आणि संकेतस्थळांनी यापूर्वीच दिले आहे.
News18Post | ArchivedPost | NewindianexpressPost | ArchivedPost | BusinessinsiderPost | ArchivedPost |
HindustantimesPost | ArchivedPost | NdtvPost | ArchivedPost |
निष्कर्ष
याबाबत करण्यात आलेल्या तथ्य पडताळणीत आढळून आले की, ही महिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेकअप आर्टिस्ट नाही. ही महिला ‘मादाम तुसाद वॅक्स म्यूझियम’ची कर्मचारी आहे. ही महिला ‘मादाम तुसाद वॅक्स म्यूझियम’मध्ये ठेवण्यासाठी बनविण्यात येणाऱ्या मेणाच्या पुतळ्याची प्रक्रिया पूर्ण करत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीत हे वृत्त असत्य आढळले आहे.

Title:सत्य पडताळणी : मोदींच्या मेकअप आर्टिस्टला 15 लाख पगार?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
