Fact Check : प्रतापगडाचे हे छायाचित्र खरे आहे का?

False राजकीय | Political

महाराष्ट्रातील प्रतापगडाचे म्हणून एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे. हे छायाचित्र महाराष्ट्रातील प्रतापगडाचे आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

या पोस्टमध्ये दर्शविण्यात आलेले छायाचित्र हे नक्की महाराष्ट्रातील प्रतापगडाचे आहे का? याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळास भेट दिली. या ठिकाणी उपलब्ध असलेली प्रतापगडाची माहिती आणि छायाचित्र पाहिल्यास हे छायाचित्र प्रतापगडाचे नसल्याचे स्पष्ट होते.

अक्राईव्ह

दैनिक लोकमतच्या संकेतस्थळानेही प्रतापगड किल्ल्याविषयी 19 फेब्रुवारी 2019 रोजी माहिती प्रसिध्द केली आहे. या वृत्तात प्रतापगडाची असंख्य छायाचित्रे वापरण्यात आलेली आहेत. ही छायाचित्रेही व्हायरल होत असलेल्या छायाचित्राशी जुळत नाहीत.

अक्राईव्ह

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळास आम्ही भेट दिली. या संकेतस्थळावरही प्रतापगडाविषयी माहिती देण्यात आली आहे. या माहितीसह या संकेतस्थळावर प्रतापगडाची काही छायाचित्रेही देण्यात आली आहेत. या छायाचित्रांमध्येही वरील छायाचित्र कुठेही आढळत नाही.

अक्राईव्ह

गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आम्ही हे छायाचित्र नेमके कुठले आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आम्हाला हे छायाचित्र तेलंगणमधील वारंगल येथील किल्ल्याचे असल्याचे दिसून आले.

निष्कर्ष

महाराष्ट्रातील प्रतापगडाचे म्हणून व्हायरल होत असलेले हे छायाचित्र प्रत्यक्षात वारंगल येथील किल्ल्याचे प्रवेशद्वार असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत दिसून आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रतापगडाचे म्हणून पोस्ट करण्यात आलेली माहिती असत्य असल्याचे आढळले आहे.

Avatar

Title:Fact Check : प्रतापगडाचे हे छायाचित्र खरे आहे का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False