
लोकसभा 2019 निवडणूकीनंतर नवीन मंत्रीमंडळाची स्थापना झाली. त्यानंतर एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये भारताचे नवीन शिक्षणमंत्री यांच्याकडे दोन बनावट पदव्या आहेत असे म्हणण्यात आले आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने केली सत्य पडताळणी.
सत्य पडताळणी
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये भारताच्या नवीन शिक्षण मंत्र्याचे श्रीलंकेतील बनावट विद्यापीठातील दोन बनानट पदव्या आणि त्यात भर म्हणजे जन्माच्या दोन तारखा आहेत असे म्हटले आहे.
या पोस्टची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही सर्वप्रथम भारत सरकारच्या ऑफिशिअल वेबसाईटवर केंद्रीय खातेनिहाय मंत्रीमंडळ याचा तपास केला. या केंद्रीय खातेनिहाय मंत्रीमंडळाच्या लिस्टमध्ये नवीन शिक्षणमंत्री असे कोणतेही पद अस्तित्वात नाही. परंतू केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळाच्या लिस्टमध्ये एचआरडी मिनीस्टर म्हणजेच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री हे पद शिक्षण क्षेत्राशी निगडित काम करणारे खाते आहे. त्यामुळे या खात्याच्या मंत्र्याची माहिती मिळवली. केंद्रीय खातेनिहाय मंत्रीमंडळाच्या लिस्टमध्ये 12 व्या नंबरवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून रमेश पोखरियाल निशंक यांची निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय खातेनिहाय मंत्रीमंडळ । अर्काईव्ह
त्यानंतर फॅक्ट क्रिसेंडोने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याविषयी माहिती जाणून घेतली. भारत सरकारच्या निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर आम्ही रमेश पोखरियाल निशंक यांची माहिती शोधली.
भारत सरकार निवडणूक आयोग । अर्काईव्ह
त्यानंतर भारत सरकारच्या निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर सध्याचे विद्यमान लोकसभा 2019 साठीचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अफेडिव्हेटमध्ये त्यांचे शिक्षण याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्या अफेडिव्हेटनुसार रमेश पोखरियाल निशंक यांनी श्रीनगर येथील गढवाल विद्यापिठातून एमए ही पदवी घेतलेली आहे. तसेच त्यांना मानद पीएचडी आणि मानद डिलिट ही पदवी देखील मिळालेली आहे.
भारत सरकार निवडणूक आयोग । अर्काईव्ह
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री यांना मिळालेल्या मानद पीएचडी आणि डी.लिट या दोन्हीही पदव्यांविषयी प्रसारमाध्यमांमध्ये विविध बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. स्वतः रमेश निशंक यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या मानद पीएचडी आणि डीलिट या दोन्हीही पदव्यांसंबंधी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे.
हिंदूस्तान डॉट कॉम । अर्काईव्ह
प्रसारमाध्यमामध्ये सध्याचे विद्यमान केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश निशंक यांच्याकडे असणाऱ्या मानद पीएचडी आणि मानद डी.लिट पदवी याविषयी विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.
संपुर्ण संशोधनानंतर भारताचे नवीन मंत्रीमंडळातील केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे दोन बनावट पदव्या आहेत की नाही हे पूर्णपणे स्पष्ट होत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे बनावट दोन पदव्या आहेत हे असत्य आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री यांच्या दोन जन्मतारखा आहेत का?
रमेश निशंक यांच्या जन्मतारखेबद्दल पोस्टमध्ये दोन तारखा नमूद आहेत असे म्हटले आहे. याविषयी स्वतः रमेश निशंक यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्ट केले आहे. त्यांच्या दोन जन्मतारखा आहेत,परंतू ते जन्म पत्रिकेनुसार तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे देण्यात आलेले आहेत.
एकूणच पोस्टमध्ये करण्यात आलेल्या भारताच्या नवीन शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे दोन बनावट पदव्या नाहीत. परंतू त्यांच्या दोन जन्मतारखा असून, एक तिथीनुसार आणि तारखेनुसार जन्मतारीख आहे.
निष्कर्ष : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा भारताच्या नवीन शिक्षण मंत्र्याचे श्रीलंकेतील बनावट विद्यापीठातील दोन बनानट पदव्या आणि त्यात भर म्हणजे जन्माच्या दोन तारखा आहेत संमिश्र स्वरुपाचा आहे.

Title:भारताच्या नवीन शिक्षण मंत्र्यांच्या दोन बनावट पदव्या आहेत का?
Fact Check By: Amruta KaleResult: Mixture
