
बटन दाबा, बदल घडवा अशा शीर्षकाखाली एक फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे. या फोटोत पाठमोऱ्या बसलेल्या मोदी, शहांसारख्या दिसणाऱ्या दोन व्यक्ती गर्दीकडे पाहत आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
या फोटोची गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे पडताळणी केली असता अनेक रिझल्ट समोर आले.
सर्च रिझल्टमध्ये आलेल्या फोटोपैकी reddit चा फोटो जरा वेगळा असल्याचे दिसते. हा फोटो नेमका कुठला आहे याचा शोध घेतला असता तो हिमाचल प्रदेशातील शिमला येथील असल्याचे दिसून येते. डिसेंबर 2017 मध्ये हिमाचल प्रदेश कॅबिनेटच्या शपथ ग्रहण समारोहाच्या वेळचा हा फोटो आहे. खालील लिंकमध्ये आपण हे फोटो पाहू शकता.
PM Shri @narendramodi at the swearing-in ceremony of the Council of Ministers of the Himachal Pradesh Government in Shimla. pic.twitter.com/6vdGNfHOm4
— BJP LIVE (@BJPLive) December 27, 2017
एएनआय या वृत्तसंस्थेनेही या शपथ ग्रहण समारोहाचे वृत्त दिले आहे.
Shimla: Virender Kanwar and Vikram Singh take oath as cabinet ministers of Himachal Pradesh government pic.twitter.com/Dgbqg012XV
— ANI (@ANI) December 27, 2017
हिमाचल प्रदेश सरकारचा शपथ ग्रहण समारोह असे इंग्रजीत सर्च केल्यावर याबाबतची अनेक छायाचित्रे समोर येतात.
खालील काही फोटोंचा तुलनात्मक अभ्यास केल्यास ही व्हायरल होत असलेला फोटो बनावट असल्याचे लक्षात येते.
निष्कर्ष
मूळ फोटो कोणत्याही निवडणुकीच्या प्रचारातील नसून तो हिमाचल प्रदेशातील शिमला येथील आहे. व्हायरल होत असलेला फोटो फोटोशॉप केलेला असून असत्य असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीत दिसून आले आहे.

Title:सत्य पडताळणी : मोदी, शहांच्या सभेच्या या फोटोचे सत्य काय?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
