
भाजपला हरविण्यासाठी नक्षलवाद्यांनी काँग्रेसला साथ द्यावी, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केल्याचे वृत्त एक वृत्तपत्राचे कात्रण सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
दिग्विजय सिंह यांनी कधी अशा प्रकारचे वक्तव्य केले होते का? याची पडताळणी करताना आम्हाला सर्वप्रथम दैनिक जागरणने दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात दिग्विजय सिंह यांनी नक्षलवाद्यांनी हिंसाचार सोडून द्यावा आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे. भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसला साथ द्यावी असे म्हटल्याचे दिसत आहे.

दिग्विजय सिंह नेमके काय म्हणाले, हे जाणून घेण्यासाठी आणखी शोधले असता आम्हाला भास्कर डॉट कॉमने याबाबत दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात दिग्विजय सिंह यांनी नक्षलवाद्यांनी लोकशाहीचा मार्ग अवलंबत भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसचे समर्थन करावे, असे म्हटले आहे.

दिग्विजय सिंह रांची येथे नक्षलवाद्यांविषयी जे वक्तव्य केले त्याचा कोणताही व्हिडिओ आम्हाला आढळून आला नाही. त्यांनी नक्षलवाद्यांचा कधी निषेध केला का, याचा शोध घेतला असता त्यांचा खालील व्हिडिओ आम्हाला आढळून आला. यात ते नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायाचा निषेध करत असताना त्यांच्याविरोधात काय रणनिती असायला हवी, हे सांगत आहेत.
निष्कर्ष
दिग्विजय सिंह यांनी नक्षलवाद्यांनी लोकशाहीचा मार्ग अवलंबत भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसचे समर्थन करावे, असे म्हटले आहे. त्यांनी केवळ नक्षलवाद्यांनी काँग्रेसने साथ द्यावी असे म्हटलेले नाही. त्यांनी हे वक्तव्य 2014 मध्ये केल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट अर्धसत्य असल्याचे आढळले आहे.

Title:तथ्य पडताळणी : दिग्विजय सिंह म्हणाले, नक्षलवाद्यांनी काँग्रेसला साथ द्यावी
Fact Check By: Dattatray GholapResult: Mixture
