तथ्य पडताळणी : अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड?

Mixture/अर्धसत्य राजकीय | Political

कोलकातामध्ये ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली तोडफोड करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड याचा शोध घेण्यासाठी एसआयटी नियुक्त करण्यात आल्याचे म्हटले आहे.

ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या तोडफोडीस तृणमुल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे.

रिपब्लिकन टीव्हीने या घटनेबद्दलचे वृत्त देताना अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान ही घटना घडल्याचे म्हटले आहे. तृणमुल काँग्रेस आणि भाजपने याबाबत एकमेकांविरोधात आरोप केल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

अक्राईव्ह

दैनिक सकाळने याबाबतचे वृत्त देताना तृणमूलने या घटनेबद्दलचे पंधरा व्हिडिओ व्हायरल केले असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडेही तृणमूलने पुरावे सादर केले आहेत, असे वृत्तात म्हटले आहे.

अक्राईव्ह

तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरही या घटनेबद्दलचे व्हिडिओ टाकले आहेत.

निष्कर्ष

कोलकातामध्ये ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान तोडफोड करण्यात आली. या घटनेबाबत भाजप आणि तृणमूल काँग्रेसने परस्परविरोधात दावा केला आहे. तृणमूल काँग्रेसने याबाबतचे व्हिडिओ सादर केले आहेत. कोलकाता पोलिसांनी याबाबत चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान ही घटना घडली असली तरी त्यांच्या नेतृत्वाखाली ही तोडफोड करण्यात आली, असे स्पष्टपणे म्हणता येत नाही. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट संमिश्र स्वरुपाची आढळली आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False