सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये काश्मीरमध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठीच्या भाजप उमेदवाराचा भाजप पक्षासाठीचा रंग बदलला आहे असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने पडताळणी करेपर्यंत ही बातमी दैनिक लोकमत मधून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सत्य पडताळणी
सोशल मीडियावर एक आर्टीकल व्हायरल होत आहे. त्या आर्टीकलमध्ये असे लिहिले आहे की, काश्मीरमध्ये भाजप भगव्या ऐवजी हिरव्या रंगात. या बातमी संदर्भात सत्य जाणण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडो टीमने गुगलवर शेखर खालीद जहांगीर असे सर्च केले. त्यानंतर या विषयावर विविध वृत्तपत्रांमध्ये यासंबंधी बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीत काश्मीरचे लोकसभा 2019 साठीचे भाजप उमेदवार शेखर खालीद जहांगीर यांनी स्थानिक नागरिकांना आकर्षित करण्यासाठी प्रचारार्थ तयार करण्यात आलेल्या जाहिरातीत चक्क भगवा ऐवजी हिरव्या रंगामध्ये भाजपची जाहिरात केली आहे.
दैनिक लोकमतच्या बातमीमध्ये भाजप उमेदवार खालीद जहांगीर यांनी भाजप प्रचारार्थ काश्मीर स्थानिक पेपर ग्रेटर काश्मीर आणि उजमा काश्मीर या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात हिरव्या रंगात दिली आहे, असे म्हटले आहे.
खाली दिलेल्या लिंकवर आपण ग्रेटर काश्मीर या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली 08 एप्रिल 2019 रोजीची भाजपची प्रचार जाहिरात पाहू शकतात.
दैनिक ग्रेटर काश्मीर । अर्काईव्ह (08 एप्रिल 2019)
काश्मीर उजमा । अर्काईव्ह (09 एप्रिल 2019)
या विषयावर विविध वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्या आहेत.
द न्यू इंडियन एक्सप्रेस । अर्काईव्ह
काश्मीर मधील लोकसभा निवडणूक 2019 भाजप उमेदवार खालीद जहांगीर यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर भाजप प्रचारार्थ त्यांनी केलेली प्रचार जाहिरात ट्विट केली आहे. या जाहिरातीमध्ये त्यांनी हिरव्या आणि भगव्या या दोन्हीही रंगांचा वापर केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये लिहिण्यात आल्याप्रमाणे काश्मीरमध्ये भाजप नव्या ढंगात, भगव्या ऐवजी हिरव्या रंगात. या संदर्भात संशोधन केल्यानंतर असे आढळून आले की, काश्मीर मधीर स्थानिक वृत्तपत्र ग्रेटर काश्मीर यामध्ये भाजप लोकसभा 2019 प्रचारार्थ जाहिरात भगव्या ऐवजी हिरव्या रंगात देण्यात आली आहे. पण लोकमतमधील बातमीमध्येच देण्यात आलेल्या दुसऱ्या स्थानिक काश्मीर वृत्तपत्र उजमा काश्मीर यामध्ये भाजप लोकसभा 2019 साठीचे उमेदवार खालीद जहांगीर यांची प्रचार जाहिरात हिरव्या आणि भगव्या या दोन रंगात देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे इतर वृत्तपत्रांमध्ये लोकसभा 2019 साठी भाजप उमेदवार खालीद जहांगीर यांच्या संदर्भात देण्यात आलेली भाजप प्रचारार्थ जाहिरात ही हिरव्या-भगव्या या दोऩ्हीही रंगात देण्यात आल्या आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये भाजप भगव्या ऐवजी हिरव्या रंगात हे तथ्य संमिश्र आहे.
निष्कर्ष : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये काश्मीरमध्ये भाजप भगव्या ऐवजी हिरव्या रंगात असे लिहिण्यात आले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने याविषयी सत्य पडताळणी केल्यानंतर केवळ काश्मीर मधील स्थानिक वृत्तपत्र ग्रेटर काश्मीर यामध्येच भाजपची लोकसभा 2019 साठीचा भाजप उमेदवार प्रचार जाहिरात संपुर्ण हिरव्या रंगात प्रसिद्ध झाली आहे. परंतू इतर वृत्तपत्रांमध्ये जम्मू – काश्मीरमध्ये भाजप लोकसभा 2019 साठीचा भाजप उमेदवार खालीद जहांगीर प्रचार जाहिरात भगव्या आणि हिरव्या रंगात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये भाजप भगव्या ऐवजी हिरव्या रंगात हे तथ्य संमिश्र आहे.

Title:काश्मीरमध्ये भाजप भगव्या ऐवजी हिरव्या रंगात दिसत आहे का? : सत्य पडताळणी
Fact Check By: Amruta KaleResult: Mixture
