सत्य पडताळणी : अमोल कोल्हे काँग्रेसमध्ये आहेत का?

False राजकीय | Political

अमोल कोल्हे सर हा व्हिडिओ पहाच आणि विचार करा तुम्ही ज्या पक्षात गेला आहात त्या पक्षाने काय दिवे लावले आहेत, असे म्हणत सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. या व्हिडिओत एका काश्मिरी पंडिताने काँग्रेसवर टीका केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अमोल कोल्हे काँग्रेसमध्ये आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो. फॅक्ट क्रेसेंडोने ते काँग्रेसमध्ये आहेत का, याची तथ्य पडताळणी केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

अमोल कोल्हे हे नेमके कोण आहेत याची पडताळणी करण्यासाठी आम्ही विकिपीडियावर गेलो त्या ठिकाणी ते कोण आहेत. ते सध्या कोणत्या राजकीय पक्षात आहेत याची माहिती दिसून येते.  

आक्राईव्ह लिंक

द हिंदूने 2 मार्च 2019 रोजी अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त दिले आहे. कोल्हे यांच्याप्रमाणेच अन्य काही जणांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

टाईम्स नाऊ न्यूज डॉट कॉम या संकेतस्थळाने 15 मार्च 2019 रोजी अमोल कोल्हे यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे, याचे वृत्त दिले आहे.

आक्राईव्ह लिंक

अमोल कोल्हे यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकेतस्थळावर दिसून येते. ही यादी आपण खालील लिंकवर पाहू शकता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी  

दैनिक सकाळमध्ये प्रसिध्द झालेल्या एका वृत्तात डॉ. अमोल कोल्हे हे महाआघाडीचे उमेदवार असल्याचे म्हटले आहे.

या महाआघाडीत नेमके कोण आहे यांचा शोध घेताना आम्हाला बीबीसी मराठीचे खालील वृत्त दिसून आले. या महाआघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह 56 घटक असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. यातून अमोल कोल्हे हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार असल्याचे स्पष्ट होते. ते काँग्रेसमध्ये नसून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याचे अन्य पुराव्यांवरून स्पष्ट होते.

आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

अमोल कोल्हे सर हा व्हिडिओ पाहाच आणि विचार करा तुम्ही ज्या पक्षात गेला आहात त्या पक्षाने काय दिवे लावले आहेत, असे म्हटलेल्या या पोस्टमुळे अमोल कोल्हे हे काँग्रेसमध्ये असल्याचा समज होतो. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत अमोल कोल्हे काँग्रेसमध्ये नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी ही पोस्ट असत्य आढळली आहे.   

Avatar

Title:सत्य पडताळणी : अमोल कोल्हे काँग्रेसमध्ये आहेत का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False