Fact Check : मतदान न केल्यास बँक अकाऊंटमधून 350 रुपये वजा होणार

False राजकीय | Political

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान न करणे महागात पडणार आहे. निवडणूक आयोगाने मतदान न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार, मतदान न करणाऱ्या व्यक्तींची ओळख आधारकार्डद्वारे होणार आहे. तर, या कार्डद्वारे लिंक असलेल्या बँकेतून 350 रुपये वजा होणार आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने यांसदर्भात सर्वच सरकारी बँकांना आदेश दिले आहेत, अशी माहिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या माहितीची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

निवडणूक आयोगाने खरंच असा काही आदेश दिला आहे का? याबाबतचे वृत्त कोणत्या मराठी वृत्तपत्राने दिले आहे का? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला दैनिक लोकमतने याबाबतचे एक वृत्त दिनांक 21 मार्च 2019 रोजी प्रसिध्द केल्याचे दिसून आले. या वृत्ताखाली स्पष्टपणे हे वृत्त होळीसाठी प्रसिध्द करण्यात आल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने अशी शक्कल लढवायला हवी असे म्हटले आहे, त्यातुन निवडणूक आयोगाने असा कोणताही निर्णय घेतल्याचे स्पष्ट होते.

अक्राईव्ह

निवडणूक आयोगाने असा कोणता निर्णय दिला आहे का? याची पडताळणी आम्ही निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन केली. त्यावेळी आम्हाला असा कोणताही निर्णय दिसून आला नाही.

अक्राईव्ह

निष्कर्ष

निवडणूक आयोगाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अशी कोणतीही माहिती आढळत नाही. दैनिक लोकमतने याबाबत दिलेले वृत्त हे केवळ होळीनिमित्त देण्यात आले होते. ते अनेक ठिकाणी सत्य म्हणून व्हायरल करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : मतदान न केल्यास बँक अकाऊंटमधून 350 रुपये वजा होणार

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False