लोकसत्तेचा लोगो वापरुन संभाजी भिडे यांच्या नावाने बनावट ग्राफिक व्हायरल; वाचा सत्य

False Social

शिवप्रतिष्ठान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्या नावाने एक आक्षेपार्ह विधान व्हायरल होत आहे. लोकसत्ता वृत्तपत्राच्या लोगो असलेल्या ग्राफिक कार्डद्वारे हे विधान पसरविले जात आहे.  

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, संभाजी भिडे यांनी असे वक्तव्य केलेले नसून लोकसत्ताच्या वेबसाईटनेसुद्ध अशी कोणती ही बातमी दिलेली नाही.

काय आहे दावा ?

संभाजी भिडे यांचा फोटो आणि लोकसत्ता वेबसाईटचा लोगो असणाऱ्या व्हायरल ग्राफिकमध्ये संभाजी भिडे यांच्या आईवडिलांविषयी अश्लाघ्य वक्तव्य दिलेले आहे. 

असे विधान संभाजी भिडे यांनी स्वतः केले असल्याचा दावा कला जात आहे. 

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

संभाजी भिडे यांनी खरंच असे विधान केले असते तर ही नक्कीच एक मोठी बातमी झाली असती. परंतु, अशी कोणतीही बातमी आढळली नाही.

तसेच लोकसत्ताच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील हे ग्राफिक आढळले नाही.

या उलट लोकसत्ताच्या फेसबुक पेजवर खालील प्रमाणे ग्राफिक कार्ड आढळले. या पोस्टमधील फोटो आणि लोगो एक सारखे आहे, परंतु, विधान वेगळे आहे.

आर्काइव्ह

लोकसत्ताच्या बातमीनुसार 26 जुलै रोजी नागपूरमध्ये श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेच्या एक कार्यक्रमात भाषण करत असताना संभाजी भिडे मानवाच्या पुनर्जन्माबाबत विधान केले की, “पती आपल्या पत्नीच्या पोटातून मुलाच्या रुपाने जन्माला येतो. तसेच एखादी महिला आपल्या मुलीच्या रुपाने स्वत: जन्म घेत असते.”

इतर वक्तव्यप्रमाणे या विधानानंतरदेखील सर्वत्र चर्चांना उधाण आले होते.

फॅक्ट क्रेसेंडोने लोकसत्ता संकेतस्थळाचे संपादक योगेश मेहेंदळे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी व्हायरल ग्राफिक बनावट असल्याचे सांगितले. तसेच लोकसत्ताने अशी कोणतीही बातमी दिली नाही, अशी माहिती दिली.

खालील मूळ ग्राफिक आणि व्हायरल ग्राफिक यांची तुलना केल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल ग्राफिक बनावट आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेले ग्राफिक फेक आहे. खोट्या दाव्यासह संभाजी भिडे यांच्या नावाने बनावट विधान व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:लोकसत्तेचा लोगो वापरुन संभाजी भिडे यांच्या नावाने बनावट ग्राफिक व्हायरल; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: False