Fact Check : नेदरलॅंडमध्ये 5G नेटवर्कच्या रेडीएशनमुळे पक्ष्यांचा मृत्यू?

False आंतरराष्ट्रीय | International

नेदरलॅंडमध्ये 5G नेटवर्कच्या रेडिएशनमुळे 297 पक्ष्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

नेदरलॅंडमध्ये 5G नेटवर्कच्या रेडिएशनमुळे खरंच 297 पक्ष्यांचा मृत्यू झाला का? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला telecompaper.com या संकेतस्थळावर 28 जून 2018 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार नेदरलॅंडमध्ये 5G नेटवर्कची चाचणी घेण्यात आली पण यात एकाही पक्षांचा मृत्यू झालेला नाही.

Archive

डच न्यूज या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार 5 G रेडिएशन आणि या पक्षांच्या मृत्यूचा कोणताही संबंध नाही.

स्नूपस या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार हेल्थ नट न्यूज या ब्लॉगने हे वृत्त सगळ्यात पहिल्यांदा दिले मात्र या ब्लॉगची विश्वसनीयता शंकास्पद आहे. स्थानिक प्रशासनाने विषबाधेतून हा प्रकार घडला असावा, असा संशय व्यक्त केल्याचे स्नूपसने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

निष्कर्ष

नेदरलॅंडमध्ये 5G नेटवर्कच्या रेडीएशनमुळे पक्ष्यांचा मृत्यू झालेला नाही. पक्षांचा मृत्यू विषबाधेतून घडल्याचा संशय स्थानिक प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेडोंच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : नेदरलॅंडमध्ये 5G नेटवर्कच्या रेडीएशनमुळे पक्ष्यांचा मृत्यू?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False