Fact Check : पुण्यातील धायरी फाटा उड्डाण पुलाला तडा गेला आहे का?

False सामाजिक

हा आहे आपल्या पुण्यातील धायरी फाटा येथील पुल. याला तडा गेला आहे. तरी पुण्यातील माझे सर्व बंधूभगिनी यांनी काळजी घ्यावी आणि मनपा प्रशासन आपण वेळीच योग्य उपाय योजना करावी अन्यथा – – – Please Share this post mostly अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावरुन शेअर होत आहे. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी 

पुण्यातील धायरा फाटा येथील पुलाला खरेच तडे गेले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी आम्ही गुगलवर crack developed on bridge at pune असे टाकले. त्यावेळी खालील परिणाम आमच्यासमोर आला. 

दैनिक सकाळच्या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार धायरी फाट्यावरील पुलाला तडे नसून ती सांधेजोड आहे. या उड्डाण पुलाचे संरक्षण कठडे धोकादायक नसून सुरक्षित असल्याचे या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे. तांत्रिकदृष्टया दोन संरक्षण कठड्यांमधील सोडलेले एक इंचाचे अंतर असल्याचे प्रकल्प विभागाचे अभियंता श्रीनिवास बोनला यांनी यासंदर्भात सांगितल्याचे वृत्तात म्हटले आहे. 

दैनिक सकाळ / Archive

महाराष्ट्र टाईम्सनेही या घटनेबद्दल वृत्त दिले असून धायरी फाटा उड्डाणपूल सुस्थितीतच असल्याचे म्हटले आहे. समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या जाणाऱ्या चुकीच्या संदेशांवर, अफवांवर विश्वास ठेवू नये, पुलाच्या दोन जोडण्यांमधील ही मोकळी जागा असल्याचे या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे. 

पुणे महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला यांनी याबाबत नेमके काय म्हटले आहे, हे आपण खाली पाहू शकता. 

निष्कर्ष

पुण्यातील धायरी फाटा येथील स्वर्गीय माजी आमदार रमेश वांजळे उड्डाणपुलाला तडा गेल्याचे समाजमाध्यमांमध्ये पसरत असलेले वृत्त असत्य असल्याचे पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : पुण्यातील धायरी फाटा उड्डाण पुलाला तडा गेला आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False