सत्य पडताळणी : तांब्याच्या भाड्यात पाणी पिल्याने होतो आरोग्यास फायदा

Mixture/अर्धसत्य

तांब्याच्या भाड्यात पाणी पिल्याने आरोग्यास फायदा होतो, असा दावा MaayMarathi या संकेतस्थळाने केला आहे. तांब्याच्या भाड्यात पाणी पिल्याने आरोग्यास हे फायदे नक्की होतात का याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेन्डो या संकेतस्थळाने केली आहे.

आक्राईव्ह लिंक

शर्यत अजून संपलेली नाही , कारण मी अजून जिंकलो नाही या फेसबुक पेजवर ही बातमी शेअर करण्यात आली आहे. या पोस्टला एका तासातच 859 लाईक्स आले आहेत. हे वृत्त 187 जणांनी शेअर केले आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

तांब्याच्या भांडयातील पाण्याचे शूद्धीकरण होते, असा नेचर या आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त मासिकातील एका लेखातही करण्यात आला आहे.

आक्राईव्ह लिंक

तांब्याच्या किंवा पितळाच्या कल्हई केलेल्या भांड्यात पाणी ठेवलेले असेल तर त्यातील अनेक प्रकारचे सूक्ष्म जीव मरतात, असे एक संशोधन असल्याचे VyaasPith या संकेतस्थळाने म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

खाली देण्यात आलेल्या लिंकमध्येही तांब्याच्या महत्वाविषयी माहिती देण्यात आली आहे. शरिरात तांब्याचे प्रमाण जास्त झाल्यावर काय घडते याचाही उल्लेख यात आहे. तांब्याच्या भांड्याविषयी यात काहीही म्हटलेले नाही.

Onlyayurved.blogspot

तांब्याचा धातूपात्रातील पाणी, आरोग्यासाठी चांगले का एक खूळ? असा एक लेख बोभाटा-डॉट-कॉमने टाकला आहे. संशोधनान्ती अशाप्रकारे धातूंचे गुण पाण्यात उतरल्याचं सिद्ध होत नाही पण परंपरेने हे सत्य मानण्यात येतं आणि म्हणूनच अशाप्रकारे धातूपात्रातील पाण्याचे सेवन लोक आजही करत आहेत, असे बोभाटाने म्हटले आहे.

तांब्याच्या भांडयातील पाण्याच्या फायद्याविषयी माहिती घेण्यासाठी आम्ही कुडाळ येथील वैद्य सुविनय दामले (बीएएमएस, आयुर्वेदाचार्य, मुंबई विद्यापीठ) यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी तांब्याच्या भांडयातील पाण्याचे आरोग्यास फायदे होतात, असे सांगितले. काही जण रात्री पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवतात आणि सकाळी पितात. यात आरोग्यास विषबाधेचा धोका असल्याचे त्यांनी नमूद केले. सकाळच्या वेळी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून ते संध्याकाळी पिल्यास आरोग्यास फायदा होतो, असे त्यांनी नमूद केले. पाणी पिल्याने आजारीच पडत नाही, हा दावा खोटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निष्कर्ष

मायमराठी डॉट इनने आपल्या लेखात अनेक दावे केले आहेत. या दाव्याची पडताळणी केली असता यातील अनेक दावे खरे असल्याचे आढळून आले आहेत. या वृत्तात करण्यात आलेला कधीच आजारी पडणार नाही हा दावा मात्र खोटा असल्याचे दिसून येते. धातूंचे गुण पाण्यात उतरत नसल्याचे बोभाटा डॉट कॉमने म्हटले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रिसेन्टोच्या पडताळणीत ही बातमी अर्धसत्य असल्याचे समोर आले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : तांब्याच्या भाड्यात पाणी पिल्याने होतो आरोग्यास फायदा

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture/अर्धसत्य