UGC वरील स्थगितीनंतर CM योगी आणि राजनाथ सिंह यांनी आनंद साजरा केला का? वाचा सत्य

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

यूजीसीच्या नव्या नियमांवर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मिठाई खाताना दिसत आहेत.

दावा केला जात आहे की, सुप्रीम कोर्टाने यूजीसीच्या नियमांवर स्थगिती दिल्यानंतर दोन्ही नेते आनंद साजरा करत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती असे आढळले की, व्हायरल व्हिडिओ सुप्रीम कोर्टाने यूजीसीच्या नव्या नियमांवर स्थगिती देण्यापूर्वीचाच आहे

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ मिठाई खाताना दिसतात.

काही युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “यूजीसी हटवा, जलेबी पार्टी” असे लिहित आहेत.”


मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर समजले की हा व्हिडिओ सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापूर्वीचा आहे.

‘रोशन कुमार जर्नलिस्ट’ नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडिओ 1 जानेवारी 2026 रोजी पोस्ट केला होता. 

त्या पोस्टनुसार, राजनाथ सिंह अयोध्या दौऱ्यावर असताना हनुमानगढी येथे दर्शन घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी त्यांना मिठाई खाऊ घातली होती.

दैनिक जागरण’नेही 1 जानेवारी 2026 रोजी हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करून ही भेट अयोध्येतील असल्याचे म्हटले आहे. हाच व्हिडिओ येथेयेथे पाहू शकता.

https://www.facebook.com/reel/923392406685010

यूजीसी नवा नियम

सुप्रीम कोर्टाने 29 जानेवारी 2026 रोजी यूजीसीच्या नव्या नियमांवर स्थगिती दिली.

म्हणजेच, व्हायरल व्हिडिओ हा त्या निर्णयाच्या सुमारे 29 दिवस आधीचा आहे, हे स्पष्ट होते.

https://www.instagram.com/p/DUF_u2CjVyp

निष्कर्ष

व्हायरल व्हिडिओचा यूजीसीच्या नियमांवरील स्थगितीशी काहीही संबंध नाही. तो जुना व्हिडिओ असून चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्याव्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोलाफेसबुक,इन्स्टाग्रामट्विटरयेथे फॉलो करा.)

Result Stamp

Title: UGC वरील स्थगितीनंतर CM योगी आणि राजनाथ सिंह यांनी आनंद साजरा केला का? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading