Fact Check : हा व्हिडिओ पवना धरणातून पाणी सोडल्याचा आहे का?

False सामाजिक

पवना धरण म्हणून PCBToday.in या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हा व्हिडिओ खरंच पवना धरणाचा आहे का, याची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी  

पीसीबी टूडे या पेजवर असलेला हा व्हिडिओ पवना धरणाचा आहे का, हे शोधण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील दृश्ये घेऊन ती रिव्हर्स इमेज सर्च केली तेव्हा आम्हाला खालील परिणाम दिसून आला. 

या परिणामानुसार ही चीनमधील येलो रिव्हर आहे. सीजीटीएन या चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमाच्या म्हणण्यानुसार ही चीनची सगळ्या मोठी दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी आहे. या नदीला 1958 नंतर मोठा पूर आलेला नव्हता. या नदीला 2018 मध्ये अनेक मोठे पूर आल्याची सीजीटीएनने याबाबत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. या नदीमधून 2018 मध्येच Xiaolangdi धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यावेळेचा व्हिडिओ आपण खाली पाहू शकतो. हाच व्हिडिओ पवना धरणातून पाणी सोडल्याचा व्हिडिओ म्हणून व्हायरल करण्यात येत आहे. 

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यावर कसे दृश्य दिसते हे आपण खालील एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या व्हिडिओत पाहू शकता.

जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार या पवना नदीची परिस्थिती सर्वसामान्य असल्याचे दिनांक 6 ऑगस्ट 2019 रोजी नमूद करण्यात आले आहे. पुण्याच्या उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पवना धरणातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले नसल्याचे स्पष्ट केले.

निष्कर्ष

पवना धरणातून पाणी सोडल्याचा म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा चीनमधील Xiaolangdi धरणातून 2018 मध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याचा आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : हा व्हिडिओ पवना धरणातून पाणी सोडल्याचा आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False