उद्धव ठाकरेंनी मुस्लिम संघटनांना विधानसभा निवडणुकीत 15 % जागा देण्याचे आश्वासन दिले नाही; वाचा सत्य
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा वेबसाईटचे ग्राफिक कार्ड वापरून दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरेंनी मुस्लिम संघटनांना विधानसभा निवडणुकीत 15 % जागा देण्याचे आश्वासन दिले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक कार्ड आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक कार्ड बनावट असून एबीपी माझाद्वारे शेअर करण्यात आलेले नाही.
काय आहे दावा ?
उद्धव ठाकरेंचा फोटो आणि एबीपी माझा वेबसाईटचा लोगो असणाऱ्या व्हायरल ग्राफिकमध्ये लिहिलेले आहे की, “मुस्लिम संघटनांना आश्वासन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 15 % जागा देणार - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
उद्धव ठाकरे यांनी असे विधान केले असते तर नक्कीच मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी बातमी कुठेच आढळले नाही.
तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील हे ग्राफिक आढळले नाही.
याउलट एबीपी माझाच्या वेबसाईटवर असणारे ग्राफिक कार्ड आणि व्हायरल ग्राफिक कार्डमध्ये फरक आढळला.
फॅक्ट क्रेसेंडोने एबीपी माझाचे सोशल मीडिया प्रमुख मेघराज पाटील यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, “व्हायरल ग्राफिक बनावट असून एबीपी माझाने अशी कोणतीही बातमी दिलेली नाही.”
वरील ग्राफिक आणि कथित ग्राफिक यांची तुलना केल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल ग्राफिक बनावट आहे.
/
मुस्लिम संघटनांची मागणी
कोल्हापुरमध्ये सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट या संस्थेने मविआकडे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये 15 टक्के जागांची मागणी केली आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाला 24 जागा देण्याची मागणी केली.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल ग्राफिक कार्ड बनावट असून एबीपी माझाद्वारे जाहीर केले नाही. उद्धव ठाकरेंनी असे कोणतेही आश्वासन दिलेले नाही. खोट्या दाव्यासह एबीपी माझाच्या नावाने हे ग्राफिक शेअर केले जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)