
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाऊ रिक्षाचालक असल्याची माहिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाऊ रिक्षाचालक आहे का? याचा शोध घेण्यासाठी आम्ही गुगलवर नरेंद्र मोदी यांच्यासारखा दिसणारा कोणी रिक्षाचालक आहे का? याचा शोध घेतला. त्यावेळी आम्हाला द हन्स इंडिया या वृत्तपत्रातील एक वृत्त दिसून आले. या वृत्तात नरेंद्र मोदी यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती आदिलाबाद येथे रिक्षाचालक असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आय न्यूज या वृत्तवाहिनीने याबाबत तेलगू भाषेत दिलेले एक वृत्तही आम्हाला यूटुयबवर दिसून आले. हे वृत्त आपण खाली पाहू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटूंबियाविषयीची माहिती आम्ही पडताळली. या माहितीतही आम्हाला त्यांचा भाऊ रिक्षाचालक असल्याची माहिती कुठेही आढळून आली नाही.
निष्कर्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाऊ म्हणून व्हायरल होत असलेला फोटो हा तेलंगण राज्यातील आदिलाबाद येथील शेख अय्यूब या रिक्षाचालकाचा आहे. हा रिक्षाचालक नरेंद्र मोदी यांचा भाऊ नसून एक सर्वसामान्य नागरिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख अय्यूब यांच्या चेहऱ्यात केवळ साम्य आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही बाब स्पष्ट झाली आहे. त्याच्या कुटूंबाच्या माहितीतही कोणीही रिक्षाचालक असल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाऊ रिक्षाचालक आहे का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
