
लंडन नाईट क्लबमध्ये नृत्य करताना महात्मा गांधी असे म्हणणारे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या छायाचित्राची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
महात्मा गांधींचे म्हणून व्हायरल करण्यात येत असलेले हे छायाचित्र पाहिल्यास आपल्यास हे लक्षात येते की, त्यांच्या मूळ छायाचित्रांमध्ये त्यांचे शरीर पिळदार नसल्याचे दिसून येते. महात्मा गांधींची पादत्राणेही या छायाचित्रातील पादत्राणापेक्षा वेगळी आहेत. नृत्य करणारी व्यक्ती हा ऑस्ट्रेलियन अभिनेता आहे. सिडनीमध्ये 1946 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा फोटो काढण्यात आला होता.

फॅक्ट क्रेसेंडोने गतवर्षी इंग्रजीतही याचे फॅक्ट चेक केले होते.
निष्कर्ष
महात्मा गांधी नृत्य करत असलेले छायाचित्र म्हणून पसरविण्यात येणारे हे छायाचित्र एका ऑस्ट्रेलियन अभिनेत्याचे आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:तथ्य पडताळणी : महात्मा गांधींचे हे छायाचित्र खरे आहे का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
