Fact check : उर्मिला मातोंडकर मोहन भागवतांची भाची आहे का?

False राजकीय | Political

काँग्रेस नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाची आहेत, असा दावा सध्या सोशल मीडियावर करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची सत्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

उर्मिला मातोंडकर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाची आहेत का? याची पडताळणी करण्यासाठी आम्ही मातोंडकर यांच्या फेसबुक अकाऊंटला भेट दिली. त्याठिकाणी अबाऊट या विभागात अशी कोणतीही माहिती आम्हाला आढळून आली नाही.  

अक्राईव्ह

उर्मिला मातोंडकर यांच्या ट्विटर अकाऊंटवरही आम्हाला याबाबतची कोणतीही माहिती आढळून आली नाही. सोशल मीडियावर मात्र उर्मिला मातोंडकर या विवाहबध्द झाल्या त्यावेळी म्हणजेच 2016 मध्येही अशी माहिती पसरविण्यात आल्याचे आम्हाला दिसून आले. उर्मिला मातोंडकर यांनी स्वत: आपण मोहन भागवत यांच्या भाची असल्याचे नाकारले आहे. दैनिक लोकमतने याबाबतचे वृत्त दिलेले आहे.

अक्राईव्ह

इंडिया टुडेचे पत्रकार साहिल जोशी यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या घेतलेल्या एका मुलाखतीत मातोंडकर यांनी आपण भागवत यांचे नातलग असल्याचे नाकारले आहे. खाली दिलेल्या लिंकमध्ये 9 मिनिटे 30 सेकंद ते 9 मिनिटे 48 सेकंद या वेळेत तुम्ही याबद्दल ऐकू शकता.

निष्कर्ष

काँग्रेस नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाची असल्याचा कोणताही पुरावा आढळत नाही. स्वत: उर्मिला मातोंडकर यांनीही याबाबतचा खुलासा केलेला आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact check : उर्मिला मातोंडकर मोहन भागवतांची भाची आहे का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False