
धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदें यांना पाठिंबा दिल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदें यांना पाठिंबा दिला आहे का, याचा शोध घेत असताना आम्हाला karmalamadhanews24.com या संकेतस्थळावर खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात त्यांनी भाजपला पाठिंबा दिला असल्याचे स्पष्ट म्हटले आहे.

सुभाष देशमुख यांच्या ऑफिशल फेसबुक पेजवरही उत्तमराव जानकर यांनी भाजपचा प्रचार करणार असल्याची माहिती देणारी असल्याचे दिसून येते.
दैनिक लोकमतने माढा मतदारसंघातील प्रचाराबाबत वृत्त दिले असून या वृत्तातही उत्तमराव जानकर हे भाजपचा प्रचार करत असल्याचे म्हटले आहे.

धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदें यांना पाठिंबा दिला आहे का, याबाबत फॅक्ट क्रेसेंडोने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण संजय शिंदें यांना पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट केले.
निष्कर्ष
धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर हे भाजपचा प्रचार करत आहेत. त्यांनी माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदें यांना पाठिंबा दिल्याचे स्वत: नाकारले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे वृत्त असत्य आढळून आले आहे.

Title:सत्य पडताळणी : उत्तमराव जानकरांनी संजय शिंदेंना पाठिंबा दिलाय का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
