
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या दौऱ्यावर होते. याच पार्श्वभूमीवर देवभूमी उत्तराखंड विद्यापीठाचे एक पत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात देवभूमी उत्तराखंड विद्यापीठाच्या
विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. उपस्थिती प्रत्येक विद्यार्थ्याला 50 अंतर्गत गुण दिले जातील.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे पत्रक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल पत्रक बनावट असून देवभूमी उत्तराखंड विद्यापीठाद्वारे जारी करण्यात आलेले नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल पत्रकात म्हटले आहे की, “सर्व बी.टेक सीएसई आणि स्पेशलायझेशन (द्वितीय वर्ष) आणि बीसीए (द्वितीय वर्ष) विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की त्यांनी रविवार, 9 नोव्हेंबर 2025 रोजी एफआरआय येथे होणाऱ्या आगामी कार्यक्रमात उपस्थित राहावे, जिथे भारताचे माननीय पंतप्रधानांशी संवाद साधला जाईल. या कार्यक्रमात उपस्थिती भारतीय ज्ञान परंपरा (भारतीय ज्ञान प्रणाली) अभ्यासक्रमांतर्गत विचारात घेतली जाईल आणि प्रत्येक सहभागीला 50 अंतर्गत गुण दिले जातील. म्हणून, भारतीय ज्ञान प्रणाली अभ्यासक्रम असलेल्या सर्व कार्यक्रमांसाठी या कार्यक्रमात सहभाग अनिवार्य आहे. डॉ. रोहित गोयल विभागप्रमुख बीसीए आणि श्री. गोविंद सिंह पनवार कार्यक्रम समन्वयक (बी.टेक. सीएसई द्वितीय वर्ष) यांच्या आदेशानुसार.”
युजर्स हे पत्रक शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “देवभूमी उत्तराखंड विद्यापीठ मोदींच्या रॅलीत सहभागी होणाऱ्यांना 50 गुण देणार! आणि मोदी मोदी ओरडणाऱ्यांना किती गुण?”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
किव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल पत्रक बनावट असून देवभूमी उत्तराखंड विद्यापीठाद्वारे जारी करण्यात आलेले नाही.
तसेच देवभूमी उत्तराखंड विद्यापीठाच्या सोशल मीडिया पेजवर असे कोणतेही पत्रक आढळत नाही.
देवभूमी उत्तराखंड विद्यापीठने 8 नोव्हेंबर रोजी आपल्या अधिकृत फेसबुक पेज वर एक पत्रक जारी करत व्हायरल दाव्याचे खंडन केले.
पत्रकात लिहिले होते की, पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “आमच्या लक्षात आले आहे की 9 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एफआरआय भेटीसाठी देवभूमी उत्तराखंड विद्यापीठाच्या (डीबीयूयू) नावाने गुणांबाबत एक बनावट सूचना प्रसारित करण्यात आली आहे. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की ही सूचना पूर्णपणे खोटी असून विद्यापीठाने जारी केलेली नाही. त्यावर कोणतीही अधिकृत स्वाक्षरी, संदर्भ क्रमांक किंवा अधिकृतता नाही. अचूक माहितीसाठी कृपया फक्त अधिकृत डीबीयूयू संप्रेषण चॅनेलवर अवलंबून रहा.”

मूळ पोस्ट – फेसबुक
पीआयबीचे खंडन
पीआयबी फॅक्ट चेकच्या अधिकृत एक्स हँडलवर 8 नोव्हेंबर रोजी ट्विट शेअर करत व्हायरल दाव्याचे खंडन केलेले आढळले.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल पत्रक बनावट आहे. देवभूमी उत्तराखंड विद्यापीठाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे कोणतेही पत्र जारी केलेले नाही. विद्यापीठाने हा दावा फेटाळून लावला.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
Title:देवभूमी उत्तराखंड विद्यापीठाने पंतप्रधानांच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य केली का ? वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: False


