इस्रायली जनतेने इराणची माफी मागत युद्ध थांबवण्याची विनंती केली का ? वाचा सत्य

False Social

इराण आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इस्रायली जनता इराणची माफी मागत युद्ध थांबवण्याची विनंती करताना दाखवलेली आहे.

दावा केला जात आहे की, “इस्रायली जनतेने इराणची माफी मागितली आणि युद्ध थांबवण्याची विनंती केली.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ खरा नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये इस्रायली झेंडे हातात घेऊन जमाव म्हणतो की, “इराण, आम्हाला माफ करा, कृपया युद्ध थांबवा, आम्हाला शांतता हवी आहे.”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “बघा ज्या वेळी गाजा फल्सतीन सारख्या छोट्याशा देशातील , लहान लहान मुलांना, आई बहीण यांना उपाशी ठेऊ ठेऊ जिव घेणारा #इसराईल  इराण या देशाने हल्ले सुरू केलें तर आईची आठवण आली , माफीवीर साले आता माफ करा म्हणतेत, शांताता भंग करणारे हे लोक यांना आता स्वतावर आला तर शांतता पाहिजे म्हणे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम कीव्हर्ड सर्च केल्यावर इस्रायली नागरिकांनी अशी कोणती घटना घडल्याची किंवा निदर्शने रॅली काढल्याचे आढळत नाही.

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर @just_disciplin3d नामक युजरने हाच व्हिडिओ टिकटॉकवर शेअर केल्याचे आढळले.

मूळ पोस्ट – टिकटॉक | आर्काइव्ह

हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिल्यावर त्यामधील खालील तीन त्रुट्या आढळल्या.

पहिली त्रुटी म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला पहिल्या सेकंदावर उजव्या बाजूच्या व्यक्तीचा हात रिकामा आहे तर दुसऱ्या सेकंदाला त्याच व्यक्तीच्या हातात इस्रायलचा झेंडा दिसतो. 

व्हिडिओमधील दाखवलेल्या पोस्टरमध्ये स्पेलिंग मिस्टेक दुसरी त्रुटी दर्शवते. तसेच काही पोस्टरमध्ये शब्दांऐवजी अस्पष्ट चिन्ह दाखवलेले आहेत.

तिसरी त्रुटी म्हणजे व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यात बारकाईने पाहिल्यावर “Veo” हा वॉटरमार्क दिसतो. अर्थात हा व्हिडिओ “Veo3” या गुगल एआय टूलच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.

इस्रायली नागरिकांचे युद्धाबद्दल काय म्हणत आहे?

सध्या सुरु असलेल्या इराण-इस्रायल युद्धात इस्रायलमधील महत्त्वाच्या ठिकाणींवर होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे नागरिकांना भीती वाटत आहे. तसेच नागरिकांना युद्ध आणखी बिकट होण्याची भीती आहे. युद्धात हल्ल्यात सुरक्षित राहण्यासाठी भूमिगत रेल्वे स्थानकांमध्ये आश्रय घेतला असतानाही, बहुसंख्यांक नागरिकांनी इस्रायली सैन्याच्या कारवाईवर विश्वास दाखवला आहे. बहुतेक इस्रायली ज्यू लोकांनी देशाला गंभीर धोक्यापासून वाचवण्यासाठी इराणसोबत झालेल्या युद्धाला पाठिंबा दिला आहे. 

अधिक महिती येथे, येथे, येथे, येथे, व येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ खरा नसून एआय तंत्राद्वारे तयार करण्यात आला आहे. इस्रायली नागरिकांनी इराणची माफी मागत युद्ध थांबवण्याची विनंती करणारी रॅली काढलेली नाही. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:इस्रायली जनतेने इराणची माफी मागत युद्ध थांबवण्याची विनंती केली का ? वाचा सत्य

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: False


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *