स्टेजवर गाणे गाणारे हे अधिकारी बिपिन रावत नाहीत; त्यांचे नाव गिरीश लुथ्रा, वाचा सत्य

False सामाजिक

भारताचे पहिले संरक्षण दलांचे प्रमुख (CDS) जनरल बिपिन रावत यांचे नुकतेच हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात निधन झाले. त्यानंतर स्टेजवर गाणे गाणाऱ्या एका सैन्य अधिकाऱ्याचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ बिपिन रावत यांचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, या व्हिडिओत गाणे गाणारे अधिकारी बिपिन रावत नाहीत.

काय आहे दावा?

चार मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये एक सैन्यअधिकारी “घर से निकलते ही” हे लोकप्रिय गीत गात आहे. समोर प्रेक्षकांमध्येसुद्धा सैन्यअधिकारी बसलेले आहेत. पोस्टकर्त्याने लिहिले की, “स्व. बिपीनजी रावत यांनी गायलेले गाणे.”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

इंटरनेटवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च आणि कीवर्ड्सद्वारे शोध घेतल्यावर कळाले की, व्हिडियोमध्ये गाणारे अधिकारी नौदलातील निवृत्त वाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा आहेत. वेस्टर्न नेव्हल कमांडच्या 50 व्या स्थापनादिनाच्या सोहळ्यात त्यांनी हे गीत परफॉर्म केले होते.

गिरीश लुथरा यांनी स्वतः हा व्हिडियो त्यांच्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. व्हिडियोच्या सुरूवातीलाच सूत्रसंचालक गिरीश लुथरा यांचे नाव पुकारतो. आतापर्यंत 22 लाखांपेक्षा जास्तवेळा हा व्हिडियो पाहिला गेला आहे.

गिरीश लुथरा यांनी 1979 साली नौदलात प्रवेश केला होता. मे 2016 साली ते वेस्टर्न नेव्हल कमांडचे प्रमुख झाले. 31 जानेवारी 2019 रोजी ते नौदलातून निवृत्त झाले. डिसेंबर 2018 मध्ये कमांडच्या गोल्डन ज्युबली सोहळ्यात त्यांनी हे गीत गायिले होते. मीडियानेसुद्धा त्यावर बातम्या केल्या. दैनिक भास्करच्या वेबसाईटवरदेखील तशी बातमी आढळली.

मूळ बातमी येथे वाचा – दैनिक भास्कर

हा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर ‘द क्विंट’ने लुथरा यांची मुलाखत घेतली होती. यामध्ये त्यांनी करियरविषयी, गाण्याच्या आवडीविषयी आणि देशात सुरू असलेल्या परिस्थितीविषयी त्यांना काय वाटते हे सांगितले आहे. भारतीय नागरिकांनी माहितीपूर्वक भूमिका निवडावी आणि देशात शांतात कशी कायम राहिल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणतात.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, व्हायरल व्हिडियोमध्ये ‘घर से निकलते ही’ गाणे गाणारे अधिकारी जनरल बिपिन रावत नाहीत. हा व्हिडियो नौदलातील निवृत्त वाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा यांचा आहे. वेस्टर्न नेव्हल कमांडच्या 50 व्या स्थापनादिनाच्या सोहळ्यात गेल्या वर्षी त्यांनी हे गीत परफॉर्म केले होते.

Avatar

Title:स्टेजवर गाणे गाणारे हे अधिकारी बिपिन रावत नाहीत; त्यांचे नाव गिरीश लुथ्रा, वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False