नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी सोशल मीडियावर विविध दावे केले जातात. यातील अनेक खोट्या दाव्यांचे सत्य फॅक्ट क्रेसेंडोने यापूर्वी समोर आणलेले आहे.

हजारो राहुट्यांचा एक फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, तो दिल्लीबाहेर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलनातील आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा फोटो शेतकरी आंदोलनाचा नाही.

काय आहे दावा?

हजारो राहुट्यांच्या फोटोसोबत म्हटले आहे की, हे चित्र देशात इतिहास रचत आहे. निश्चितच हुकुमशाहीचा अंत जवळ आला आहे. पोस्टमध्ये #FarmersProtest टॅग वापरून शेतकरी आंदोलनाशी याचा संबंध जोडला जात आहे.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

फोटोला रिव्हर्स इमेज केल्यावर लगेच कळाले की, हा फोटो सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा नाही.

फिनलँडमधील एका पर्यटनविषयक एका वेबसाईटवर हा फोटो आढळला. विले पॅलोनेन नावाच्या लेखाकाने हा फोटो 2013 साली अलाहबादमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्यात काढला होता.

कुंभमेळ्याला भेट देण्यासाठी तो भारतात आला होता. या लेखात कुंभमेळ्यातील अनेक फोटो प्रसिद्ध केलेले आहेत.

मूळ वेबसाईट - Kerran Elämässä | अर्काइव्ह

मग आम्ही 2013 साली झालेल्या महाकुंभमेळ्याचे फोटो शोधले. गेटी इमेजस या स्टॉक-फोटो वेबसाईटवर अनेक फोटो आढळले. ते तुम्ही खाली पाहू शकता.

Embed from Getty Images

मूळ वेबसाईट – Getty Images


हेदेखील वाचा:

बंगळुरूमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःचेच सुपरमार्केट सुरू केले का?

शेतकरी आंदोलनात तिरंग्याचा अपमान करण्यात आला का?

शेतकरी आंदोलनात ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ अशा घोषणा देण्यात आल्या का?


निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, 2013 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यातील राहुट्यांचा फोटो चुकीच्या माहितीसह सध्या पसरविला जात आहे. तो शेतकरी आंदोलनातील नाही.

[आपल्याकडेदेखील असेच संशयास्पद मेसेज असतील तर पडताळणीसाठी ते आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॉरवर्ड करा किंवा या क्रमांकावर ‘Hi’ मेसेज पाठवून लेटेस्ट फॅक्ट-चेकसुद्धा वाचा – तेसुद्धा आपल्या आवडीच्या 8 भाषांमध्ये!]

Avatar

Title:कुंभमेळ्याचा 7 वर्षे जुना फोटो शेतकरी आंदोलनाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: AgastyaDeokar

Result: False