
ऑस्ट्रेलियातील जंगलात आढळणा-या ऑस्ट्रेलियन ब्लशवूड नावाच्या झाडावर असणा-या फळांच्या बियांमध्ये कॅन्सरवर प्रभावी तत्व आढळलं आहे. झी 24 तासने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तातील सत्य शोधण्याचा प्रयत्न फॅक्ट क्रिसेन्टो टीमने केला आहे.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ऑस्ट्रेलिया ब्रॉडकास्टिग कॉर्पोरेशनचा व्हिडिओ झी 24 तासने आपल्या बातम्यासोबत जोडला आहे. याच्या आधारे झी 24 तासने हे वृत्त दिले आहे. यावर 102 प्रतिक्रिया आल्या आहेत.
झी 24 तासच्या फेसबुक पेजवर या बातमीला 13 हजार लाईक्स आहेत. या बातमीला तीन हजार 820 शेअर्स आहेत.
तथ्य पडताळणी
द डेली मेल या वृत्तपत्रानेही याबाबतचे वृत्त दिले आहे. या औषधाच्या मानवी शरीरावर चाचण्या घेण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
हे वृत्त सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

डेली हंटनेही याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तात डेली हंटने या फळाने काही मिनिटात कॅन्सरपासून तुमची सुटका होऊ शकते, असे शीर्षक दिले आहे.
हे वृत्त सविस्तरपणे वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

निष्कर्ष
क्यूनलैंड येथील QIMR Berghofer Medical Research Institute कडून याबाबत संशोधन करण्यात येत आहे. क्यूनलैंड आणि ऑस्ट्रेलियातील पावसाळी जंगलात हे फळ आढळते. याचा प्रयोग जनावरांवर करण्यात आला आहे. मागील 8 वर्षापासून यावर डॉ. ग्लेन बॉयले हे संशोधन करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार यातील 75 टक्के प्रकरणात कर्करोगापासून मुक्ती मिळाली आहे. याचा कोणताही साईड इफेक्टही नाही. केवळ पाच मिनिटात याचा प्रभाव सुरु होतो. कर्करोगावरील औषधात वापरण्यात येत असलेले EVS-46 तत्व या फळात मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्रातील विविध कर्करोग तज्ज्ञांशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रियेस नकार दिला. फॅक्ट क्रिसेन्डोच्या पडताळणीत हे वृत्त खरे आढळले तरी हे फळ काही मिनिटात कॅन्सर नष्ट करत नाही. त्यामुळे या वृत्ताचे शीर्षक हे चुकीचे आहे.

Title:हे फळ काही मिनिटांत कॅन्सर नष्ट करतं; सत्य की असत्य
Fact Check By: Dattatray GholapResult: False Headline (चुकीचे शीर्षक )
