सत्य पडताळणी : फक्त 4999 रुपयांत 32 इंची स्मार्ट टीव्ही

Mixture/अर्धसत्य
 • 4
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  4
  Shares

भारतीय बाजारपेठेत सॅमी इन्फॉर्मेटिक्स या स्टार्टअप कंपनीने फक्त 4999 रुपयांत 32 इंची स्मार्ट टीव्ही आणला आहे. हा टीव्ही मेक इन इंडिया असून यासाठी कोणतीही वस्तू भारताबाहेरुन आणण्यात आलेली नाही. या टीव्हीत तुम्ही मोबाईलवर असलेले Apps ही इन्स्टॉल करु शकता. एनएमजेवेब डॉट इन्फो या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

एनएमजेवेब डॉट इन्फो / आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

भारतीय बाजारपेठेत सॅमी इन्फॉर्मेटिक्स कंपनीने आणलेल्या फक्त 4999 रुपयांच्या 32 इंची स्मार्ट टीव्हीची माहिती इंडिया टूडे नेही दिली आहे. हे वृत्त देताना इंडिया टूडेने 10 गोष्टी जाणून घेण्यास सांगितले आहे. शीर्षकातच त्यांनी हे नमूद केले आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

इंडिया टूडे / आक्राईव्ह लिंक

पीसीक्वेस्ट डॉट कॉम या संकेतस्थळानेही याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तात त्यांनी या टीव्हीमुळे 200 हून अधिक जणांना रोजगार मिळाला असल्याचे म्हटले आहे. समाजातील सर्व स्तरापर्यंत एचडी तंत्रज्ञान पोहचविण्याचे लक्ष असल्याचे सॅमी इन्फॉर्मेटिक्सने सांगितल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पीसीक्वेस्ट डॉट कॉम / आक्राईव्ह लिंक

बिझनेस टूडे या संकेतस्थळाने या टीव्हीची किंमत सात हजार रुपये असल्याचे म्हटले आहे. त्यांनी यात टीव्ही इन्स्टॉलेशन चार्जेस, जीएसटी आणि शिपिंग चार्जेसचा समावेश केला आहे. कंपनीने काही भाग हे दक्षिण कोरियातून आणल्याचेही या वृत्तात नमूद केले आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

बिझनेस टूडे / आक्राईव्ह लिंक

एनएमजेवेब डॉट इन्फो या संकेतस्थळाने या टीव्हीचे उत्पादन पुर्णपणे भारतीय बनावटीचे असल्याचा दावा केला आहे. यासाठी वापरण्यात आलेले सुटे भाग भारतीय असल्याचा दावा केला आहे. बिझनेस टूडेने मात्र यासाठी वापरण्यात येणार असल्याचे पॅनेल हे दक्षिण कोरियातून येणार असल्याचा दावा केला आहे.

निष्कर्ष

भारतीय बाजारपेठेत सॅमी इन्फॉर्मेटिक्स या स्टार्टअप कंपनीने फक्त 4999 रुपयांत 32 इंची स्मार्ट टीव्ही आणला आहे. या टीव्हीची मुळ किंमत ही 4999 रुपये आहे. या किंमतीत जीएसटी, इन्स्टॉलेशन चार्जेस याचा समावेश नाही. या टीव्हीचे पॅनल हे दक्षिण कोरियातून आणण्यात आले आहे. हा टीव्ही साधारणत:  सात ते आठ हजारापर्यंत ग्राहकास मिळतो. त्यामुळे फॅक्ट क्रिसेन्डोच्या पडताळणीत हे वृत्त अर्धसत्य आढळले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : फक्त 4999 रुपयांत 32 इंची स्मार्ट टीव्ही

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture(अर्धसत्य)


 • 4
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  4
  Shares