सत्य पडताळणी : पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी केला एका महिलेला कॉल

False खोटे

पुलवामा हल्ल्यानंतर एका शहीद जवानाच्या पत्नीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉल केल्याचे वृत्त भन्नाटरेडॉटकॉम या संकेतस्थळाने दिले आहे. या वृत्तात एक व्हिडिओही भन्नाट रे ने वापरला आहे. हे वृत्त खरे आहे का? याची पडताळणी फॅक्ट क्रिसेन्टोने केली आहे.

भन्नाट रे ने दिलेले वृत्त सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
भन्नाट रे डॉट कॉम  / आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

भन्नाट रे डॉट कॉमने वापरलेला हा व्हिडिओ 19 फेब्रुवारी 2019 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. IND News या यु ट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओला 11,928,791 views आहेत. या व्हिडिओत बोलताना शहीद जवानाची पत्नी आपल्या अडीच वर्षाच्या मुलीचे नाव सोनाक्षी श्रीवास्तवा असल्याचे सांगत आहे. या व्हिडिओत एक मिनिट 9 सेकंद ते दोन मिनिट 25 सेकंदपर्यंत तुम्ही मोदी आणि शहीद जवानाच्या पत्नीचे हे संभाषण तुम्ही ऐकू शकता.

प्रत्यक्षात सीआरपीएफने जारी केलेल्या शहीदांच्या यादीत श्रीवास्तवा नावाची कोणतीही व्यक्ती आढळत नाही. मोदी यांच्या अधिकृत यु टूयूब चॅनल  narendramodi.in वर ही आपण हा व्हिडिओ पाहू शकतो. हा व्हिडिओ 2 नोव्हेंबर 2013 चा असल्याचे यातून दिसून येते.

मोदी यांनी याबाबतचे ट्विट 2 नोव्हेंबर 2013 रोजी केले आहे.

आक्राईव्ह लिंक

मुन्ना श्रीवास्तव हा जवान मोदी यांच्या 27 ऑक्टोबर 2013 रोजी होणा-या हुंकार रॅलीपुर्वी पटना येथे शहीद झाला होता. बिझनेस स्टॅण्डर्ड या वृतपत्राने याबाबतचे वृत्त दिले होते.

आक्राईव्ह लिंक

हा व्हिडिओ 2017 मध्येही अशाच रितीने व्हायरल झाल्याचे दिसून येते.

निष्कर्ष

पुलवामा हल्ल्यानंतर एका शहीद जवानाच्या पत्नीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉल केल्याचे फॅक्ट क्रिसेन्डोने केलेल्या तथ्य पडताळणीत खोटे असल्याचे आढळून आले आहे. हा कॉल 2 नोव्हेंबर 2013 रोजी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी केला एका महिलेला कॉल

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False