शाहरुख खानने खरंच पाकिस्तानला 44 करोड रुपये मदत केली का? सत्य जाणून घ्या.

False राष्ट्रीय
 • 1
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1
  Share

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सिने अभिनेता शाहरुख खानविरोधात सोशल मीडियावर सध्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. फेसबुकवर Rajendra Dhage नावाच्या एका यूजरनेदेखील 16 फेब्रुवारी रोजी अशाच प्रकारची एक पोस्ट केली आहे. त्यात शाहरुख खानचा फोटो वापरून लिहिले की, 44 करोड दिले पाकिस्तानमधील बाॅम्बस्फोट पीडितांना, त्या बदल्यात 44 जवानांचे रक्तामासांचे तुकडे भेट दिले पाकिस्तानने. धिक्कार असो तुझा. यापुढे तुझे एकही चित्रपट पाहणार नाही.

राजेंद फेसबुक-अर्काइव्ह

पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट 2.3 हजार वेळा शेयर आणि 151 जणांनी लाईक केलेली आहे. या पोस्टखाली “याला अमेरिकेत पाठवा, तिथे व्यवस्थित स्वागत होते ह्याच”, “यालाच ठार करायला पाहिजे” अशा कमेंटसह शाहरुख खानला अर्वाच्य भाषेत शिव्या दिलेल्या आहेत. परुंतु, शाहरुखने खरंच पाकिस्तानला 44 करोड रुपये मदत केली का? याची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली.

पुलावामा हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या पोस्टचा भडिमार सुरू झाला.

ट्विटर-अर्काइव्ह

ट्विटर-अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

राजेंद्र यांच्या पोस्टमध्ये शाहरुखने कधी आणि कोणत्या बाॅम्बस्फोटानंतर पाकिस्तानातील पीडितांना 44 करोड रुपये दिले. याचा कोणताही उल्लेख नाही. याविषयी जेव्हा फॅक्ट क्रेसेंडोने गुगलवर शोध घेतला असता शाहरुख खानवर पाकिस्तानमध्ये 2017 साली झालेल्या ऑईल टँकर अपघातातील पीडितांना 45 कोटो रुपये मदत केल्याचा दावा करण्यात आला आहे. यासाठी इंडिया टीव्हीवरील एक क्लिपचा दाखला दिला जातो.

यासंबंधी पडताळणी केली असता ही क्लिप इंडिया टीव्हीवरील 4 जुलै 2017 रोजीच्या 6.35 मिनिटांच्या बुलेटीनमधून घेतलेली आहे.  मूळ व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

इंडिया टीव्हीने या व्हिडियोमध्ये स्पष्ट केले आहे की, शाहरुख खानने अशा कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही. तो भाग तुम्ही वरील व्हिडियोमध्ये 5.55 ते 6.30 दरम्यान पाहू शकता. तसेच या व्हिडियोमध्ये शाहरुख आतापर्यंत कोणकोणत्या सामाजिक कार्यात कशी मदत केली याचा उल्लेख करण्यात आला आहे.

ट्विटरवरदेखील अनेकांनी शाहरुख खानविरोधात सुरू असलेल्या खोट्या बातम्यांचे खंडन केले आहे. त्यासाठी #StopFakeNewsAgainstSRK हा हॅशटॅग वापरला जात आहे.

ट्विटर-अर्काइव्ह

ट्विटर-अर्काइव्ह

ट्विटर-अर्काइव्ह

निष्कर्ष – असत्य (FALSE)

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीतून हे स्पष्ट होते की, सदरील यूजरने केलेली पोस्ट ही चूकीच्या माहितीवर आधारित आहे. त्यात करण्यात आलेल्या दाव्याला कोणाताही पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळी ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:शाहरुख खानने खरंच पाकिस्तानला 44 करोड रुपये मदत केली का? सत्य जाणून घ्या.

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False


 • 1
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1
  Share