भाजपा आमदाराच्या राष्ट्रीय कृषी परिषदेत अश्लील नृत्य; आमदार डॉ. अनिल बोंडे यांचे आयोजन..सत्य की असत्य?

खरी न्यूज I Real News राजकीय
 • 2
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  2
  Shares

महाराष्ट्रात सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती असून याच दुष्काळ परिस्थितीतुन शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी वरुड येथे पाच दिवसापूर्वी शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विकास परिषद आयोजित केली होती. यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी व भाजपा मंत्री व आमदार यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना दिलासा देण्याजोगे मार्गदर्शन केले होते. मात्र या शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात चक्क एक अर्धनग्न कपडे परिधान करून अश्लिल डान्स झाला. यात एका किन्नर सोबत एक इसम तिला स्पर्श करून त्या किन्नर सोबत अश्लिल डान्स करत असल्याचा व्हिडीओ व्हायलर झाला आहे. अर्धनग्न ड्रेस परिधान करून किन्नर सोबत वरुडचे माजी नायबतहसीलदार डान्स करत असल्याचे दिसून येत आहे.

ही बातमी सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

विदर्भसन्मान.टीव्ही
आक्राईव्ह पोस्ट

द महाराष्ट्र लाईव्ह या फेसबुक पेजवर या बातमीचा व्हिडीओ केवळ चार तासात एक हजार 500 जणांनी पाहिला आहे. ही बातमी 7 जणांनी शेअर केली आहे. तर यावर 7 कमेंटस् आल्या आहेत.

आक्राईव्ह पोस्ट

दै. सकाळच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ दोन तासात 81 हजार जणांनी पाहिला आहे. त्यावर 182 कमेंटस आल्या आहेत. तर 273 जणांनी तो शेअर केला आहे.

आक्राईव्ह पोस्ट

तथ्य पडताळणी :

दैनिक सकाळने आपल्या बातमीत नृत्य करणा-या व्यक्तीचा उल्लेख नायब तहसिलदार असा केला आहे. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे भाजपाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी चार दिवसीय 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय कृषी विकास परिषद आयोजित केली होती. या दरम्यान 9 फेब्रुवारीला लोककला दंडार कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये पुरुष महिलांची वेशभूषा करुन नृत्य करत असतात आणि यामध्ये द्विअर्थीय संवादाच्या माध्यमातून सामाजिक विषयावार भाष्य केले जाते, असे दैनिक सकाळने म्हटले आहे.

ही बातमी सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

दै.सकाळ
आक्राईव्ह पोस्ट

लेटस्ली मराठी या संकेतस्थळावरही ही बातमी आहे. या बातमीत नाचणारी व्यक्ती ही सेवानिवृत्त नायब तहसिलदार असल्याचं म्हटलंय.

ही बातमी सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

लेटस्ली मराठी
आक्राईव्ह पोस्ट

निष्कर्ष :

राष्ट्रीय कृषी परिषदेत अश्लील नृत्य करण्यात आले. भाजपा आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी या क्रार्यक्रमाचे आयोजन केले होते. अश्लील नृत्य करणारी व्यक्ती सेवानिवृत्त नायब तहसिलदार होती की नायब तहसिलदार याबाबत मात्र निश्चित माहिती आढळलेली नाही. आमच्या पडताळणीत ही बातमी सत्य आढळली आहे.

Misleading Title: भाजपा आमदाराच्या राष्ट्रीय कृषी परिषेदेत अश्लील नृत्य; आमदार डॉ. अनिल बोंडे यांचे आयोजन..सत्य की असत्य?”
Fact Check By: Dattatray Gholap 
Result: Truth – ही बातमी सत्य आहे

 • 2
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  2
  Shares