पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्याचा बाप म्हणाला, जवान के मौत से खुशी सत्य की असत्य

असत्य शीर्षक | False Headline
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

पुलवामा हल्ल्यातील दहशतवादी आदिल डार याच्या वडीलांनी शहीद भारतीय जवानांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एनएमजेवेब डॉट इन्फो या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तात त्यांनी आदिलच्या वडिलांच्या भावना मांडल्या आहेत.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

एनएमजेवेब डॉट इन्फो / आक्राईव्ह लिंक

मराठी या फेसबुक पेजवरुन ही बातमी शेअर करण्यात आली आहे. या बातमीला एक हजार 800 लाईक्स आहेत. या बातमीवर 48 जणांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे वृत्त 38 जणांनी शेअर केले आहे.

आक्राईव्ह लिंक

लेटेस्ट मराठी जोक्स या फेसबुक पेजवरुनही ही बातमी शेअर करण्यात आली आहे. या बातमीला एक हजार 800 लाईक्स आहेत. या बातमीवर 10 जणांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे वृत्त 23 जणांनी शेअर केले आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

आदिल डारच्या वडिलांनी आपली प्रतिक्रिया दिल्याचे वृत्त दैनिक लोकसत्तानेही प्रसिध्द केले आहे. या वृत्तासाठी त्यांनी इंडिया टूडेच्या वृत्ताचा हवाला दिला आहे.अदिलचा चुलत भाऊ देखील दहशतवादी होता, अशी माहिती या वृत्तात देण्यात आली आहे. नवभारत टाईम्सनेही याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले आहे. यात आदिलच्या वडिलांनी आपल्याला आपल्या मुलाच्या कृत्याबद्दल लाज वाटत असल्याचे म्हटले आहे. आपल्या मित्राच्या घरी जात असल्याचे सांगत आदिल घराबाहेर पडला होता.  आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास आपल्या दोन्ही संकेतस्थळावरील बातमी सविस्तर वाचता येईल.

नवभारत टाईम्स / आक्राईव्ह लिंक                           लोकसत्ता / आक्राईव्ह लिंक

बिझनेझ टूडेनेही याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तातही गुलाम दार यांनी शहीद सीआरपीएफ जवानांबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी आदिल हा फक्त 12 वी पर्यंत शिकला होता असे सांगितले आहे.

खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही हा VIDEO पाहू शकता.

आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

पुलवामा हल्ल्यातील दहशतवादी आदिल डार याच्या वडीलांनी शहीद भारतीय जवानांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या भावना व्यक्त करताना त्यांनी कुठेही शहीद जवानांचा अनादर केलेला नाही. त्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. फॅक्ट क्रिसेन्डोच्या पडताळणीत एनएमजेवेब डॉट इन्फो या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्ताचे शीर्षक खोटे आढळले आहे.

Avatar

Title:पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्याचा बाप म्हणाला, जवान के मौत से खुशी सत्य की असत्य

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False Headline (असत्य शीर्षक)


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •