तथ्य पडताळणी : फ्रान्स खरंच पाकिस्तानला दणका देणार का?

आंतरराष्ट्रीय | International खरी न्यूज I Real News सत्य

पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. फेसबुकवर सध्या व्हायरल होत असलेल्या इन्फोबझच्या पोस्टमध्ये, फ्रान्सने भारताच्या बाजूने उडी घेत संयुक्त राष्ट्र संघात (यूएन) लवकरच दहशतवादी मसूद अजहरवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या वृत्ताची फॅक्ट क्रिसेन्डोने सत्य पडताळणी केली आहे.

ही बातमी येथे सविस्तर वाचा – इन्फोबझ | अर्काईव्ह

पडताळणी करेपर्यंत इन्फोबझ संकेतस्थळाच्या फेसबुक पेजवर या बातमीला 624 लाईक्स होत्या. ही बातमी 95 जणांनी शेयर केलेली आहे.

फेसबुक-अर्काईव्ह

तथ्य पडताळणी

इन्फोबझच्या बातमीत म्हटले आहे की, “दहशतवाद विरोधी लढाईत फ्रान्स भारताच्या बाजूने उतरला आहे. फ्रान्स येत्या दोन-तीन दिवसांत मसूद अजहरवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात मांडणार आहे”

आम्ही जेव्हा यासंबंधी गुगलवर शोध घेतला असता विविध वृत्तस्थळांवर (लोकसत्ता, जागरण, एनडीटीव्ही, द वीक) ही बातमी आढळून आली. यासाठी पीटीआय या वृत्तसंस्थेचा संदर्भ देण्यात आला आहे.

लोकसत्ता अर्काईव्ह | जागरण अर्काईव्ह | एनडीटीव्ही अर्काईव्ह | द वीक अर्काईव्ह

लोकसत्ताच्या बातमीत म्हटले आहे की, “दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याला दहशतवाद्यांच्या यादीत सामील करण्याची मागणी फ्रान्सकडून करण्यात येणार आहे,  अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.”

सगळ्या बातम्यांमध्ये फ्रान्स सरकारच्या सूत्राच्या आधारे माहिती मिळाल्याचे म्हटले आहे.

इन्फोबझच्या वृत्तामध्ये, “भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत विस्तृत चर्चा केली व त्यानंतर हा प्रस्ताव फ्रान्स मांडणार असल्याचे स्पष्ट झाले” असे म्हटले आहे.

परंतु, द वीक आणि एनडीटीव्हीच्या बातमीत डोवल यांनी थेट राष्ट्राध्यक्ष नाही तर त्यांच्या परराष्ट्रसंबंधविषयक सल्लागार फिलिप एतिन यांच्याशी यासंबंधात मंगळवारी, 19 फेब्रुवारी रोजी चर्चा केल्याचे सांगितले आहे.

निष्कर्ष :–

पडताळणीमधून हे स्पष्ट होते की, फ्रान्स खरोखरंच जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव येत्या दोन-तीन दिवसांत संयुक्त राष्ट्र संघात मांडण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब म्हणजे भारताच्या कुटनितीला मिळालेले यश आणि पाकिस्तानला मोठा झटका आहे. म्हणून ही बातमी सत्य (True) आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : फ्रान्सने खरंच पाकिस्तानला दणका देणार का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: True (सत्य)