टेक्सटाइल्सच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत शिट्टी वाजविण्याची खोटी न्यूज

राजकीय | Political

ट्विटरमधील काही हँडल्स हे टेक्सटाइल्सच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्री स्मृती इराणी यांचा शिटी वाजवतानाचा एक जुना फोटो शेअर करत आहेत आणि दावा करत आहेत कि अलीकडेच त्यांनी संसद मध्ये असे केले आहे.

प्रत्यक्षात, टेक्सटाइल्सच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्री स्मृती इराणी यांचा शिट्टी वाजवत असतानाचा फोटो हा तेव्हा घेण्यात आला होता जेव्हा त्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी येथे झालेल्या वार्षिक कॉन्व्होकेशन समारंभात मुख्य अतिथी म्हणून आल्या होत्या.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट मध्ये म्हटले आहे कि पास होणाऱ्या बॅच च्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्याच्या दरम्यान त्या स्टेज वर होत्या, तेव्हा इराणी यांनी त्यांचे बोट त्यांच्या तोंडात ठेवले आणि जोरात शिट्टी वाजवली आणि त्यानंतर पूर्ण जनसमुदायाने त्यांना फॉलो केले.

हे सुद्धा बघा: http://www.jantakareporter.com/india/smriti-irani-took-students-surprise-whistling/155978/