कोणताही किडा किंवा जमिनीवर सरपटणारा प्राणी चावला तर साहजिकच वेदना होते. अनेक प्रकारचे किडे असतात. त्यातल्या त्यात काही किड्यांच नुसते नाव जरी घेतलं तरी माणूस घाबरून जातो. त्यापैकीच एक म्हणजे गोम होय.

कथन

जर माणसाला गोम या सापासारख्या सरपटणारा प्राणी चावला किंव्हा गोम कानात घुसली तर डॉक्टरकडे जाण्यापूर्वी काही घरगुती उपाय केले जातात. त्यामध्ये मिठाचे पाणी कानात सोडावे, हळद व सैंधव मिठाचे मिश्रण गायीच्या तुपात मिसळून कानात लावल्याने सुद्धा फायदा होईल. अशा प्रकारची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Facebook l अर्काइव्ह

Insort marathi l अर्काइव्ह

https://insortmarathi.com/2018/11/15/bgomine-chavalyas-kay-karave/?fbclid=IwAR3Mv1XnFJkn1iZ4hK-IGC-HcFwZIKH10iyWZFG9QsG4E9HmoWBIp7GNi68

अर्काइव्ह

सत्य पडताळणी

अशा प्रकारच्या वायरल होणाऱ्या पोस्ट संदर्भात सत्य पडताळणी केल्यानंतर असे आढळून आले की, कानात गोम गेल्यानंतर कानात मिठाचे पाणी सोडणे, किंव्हा साखर त्या गोमच्या तोंडावर सोडणे, किंव्हा हळद आणि सैधव मीठ एकत्र करून चांगल्या तुपात मिसळून कानाला लावण्याने रुग्णाला काहीही फरक पडत नाही. याविषयी नाक कान घसाचे डॉक्टर यांची प्रतिक्रीया खालील प्रमाणे आहे.

या संदर्भात ईएनटी स्पेशलिस्ट डॉक्टर अतुल पोरे, औरंगाबाद यांच्याशी बातचीत केली असता, अशा प्रकारचे घरगुती उपाय केले असता रुग्णाला केवळ त्रास होतो अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे असे घरगुती उपाय करण्यापूर्वी लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क करावा. तसेच कानात काहीही घालू नये.



डॉ. अतुल पोरे
नाक कान घसा स्पेशलिस्ट, औरंगाबाद.
मोबाईल नंबर : ९९२२५०४३९४
ENT Specialist  l अर्काइव्ह

निष्कर्ष : गोम कानात घुसली तर कानात मिठाचे पाणी कानात टाकावे, किंव्हा चांगल्या तुपात हळद आणि सैधव मिसळून कानाला लावावे अश्या प्रकारच्या घरगुती उपायांची सोशल मिडियावर वायरल होणाऱ्या पोस्टमधील तथ्य खोटे आहे.

Avatar

Title:गोम कानात घुसली तर कानात मिठाचे पाणी कानात टाकावे ? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale

Result: False