काँग्रेसच्या बैठकीमध्ये पाकिस्तान झिंदाबाद म्हटल्याने कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण?

खोटी न्यूज I Fake News
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

छत्तीसगडमधील बिलासपूर येथे काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांवर लाठी हल्ला झाल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्याचे कारण काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या असे सांगितले जात आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टची केलेली ही सत्य पडताळणी…

Facebook

अक्राईव्ह लिंक  

तथ्य पडताळणी

हे प्रकरण १८ सप्टेंबर २०१८ या दिवशीचे आहे. त्या काळात छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेवर होते. सध्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. या बैठकीबद्दल विविध वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियावर बातमी प्रसिद्ध झाली आहे. वृत्तपत्रामधील बातम्यांच्या आधारे या लाठी हल्ल्याचे कारण वेगवेगळे असल्याचे समोर आले आहे.

Indiatoday l अक्राईव्ह लिंक  

Indian Express  l अर्काइव्ह

त्याचप्रमाणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पोलिसांच्या या लाठी हल्ल्याचा जोरदार विरोध केला आहे. दुसऱ्या दिवशी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून छत्तीसगड पोलिसांवर आणि मोदी सरकारवर टीका केली आहे.

अर्काइव्ह लिंक   

अर्काइव्ह लिंक

फेसबुकवर या विषयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओतील घटना १८ सप्टेंबर २०१८ रोजी छत्तीसगडमधील बिलासपूर येथे घडली आहे. सर्व वृत्तपत्रांमध्ये आणि सोशल मीडियावर झालेल्या एकूण चर्चेच्या आधारे काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण झाली आहे, हे वृत्त खरे आहे. या मारहाणीचे कारण काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या दिलेल्या घोषणा हे मात्र खोटे आहे. तिथल्या आमदाराने काँग्रेसचा उल्लेख कचरा पक्ष असा केल्याने हे कार्यकर्ते याचा निषेध करण्यासाठी या आमदाराच्या घरात कचरा फेकून आंदोलन करत होते.

मंगळवार दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांनी परिसरात लावलेले बॅरिकेडही जुमानले नाहीत. या घटनेत दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल झाला आहे.

सौजन्य :  Indian Express l

सौजन्य : Times Now

या सर्व घडामोडीनंतर काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस भवनाबाहेर धरणे आंदोलन करत होते. पोलीस त्यांना ताब्यात घेत होते तेव्हा काही कार्यकर्त्यांनी त्याला विरोध करत पोलिसांसोबत झटापट केली. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, असे बिलासपूरचे पोलीस अधीक्षक अरिफ शेख यांनी सांगितले.

निष्कर्ष :
छत्तीसगडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांवर स्थानिक पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला हे वृत्त खरे आहे. या लाठीचार्ज मागचे कारण मात्र वेगळे होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या हे असत्य आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत ही बातमी खोटी आढळली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिलेल्या नाही.

False Title: काँग्रेसच्या बैठकीमध्ये पाकिस्तान झिंदाबाद म्हटल्याने कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण?
Fact Check By: Amruta Kale 
Result: False (हे वृत्त खोटं आहे)

 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •