चीनमधील एक्सप्रेसवे बांधकामाचा व्हिडिओ जम्मू–काश्मीरचा महामार्ग म्हणून व्हायरल 

False Social

बांधकाम सुरू असलेल्या महामार्गाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेला राष्ट्रीय महामार्ग क्र. 14 प्रकल्पाचा आहे.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील महामार्ग जम्मू–काश्मीरमधील नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये काम सुरू असलेला महामार्ग दिसतो. व्हिडिओमध्ये लिहिले होते की, हा जम्मू आणि काश्मीरमधील महामार्ग क्र. 14 प्रकल्पाचा आहे.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “विकास काय असतो हा छोटासा व्हिडिओ पाहून लक्षात येईल. कश्मीर काय भरतात ही कोणी अशी कल्पना केली नसेल की डोंगर दऱ्याखोऱ्यामध्ये सुध्दा असा विकास करता येऊ शकतो!”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी 

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ भारताशी संबंधित नाही.

माइक चायना व्लॉग नामक फेसबुक पेजने हाच व्हिडिओ 22 ऑगस्ट रोजी शेअर केला होता.

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, अनलाई एक्सप्रेसवे G6911 शानक्सीमधील अंकांगला हुबेईमधील लायफेंगला जोडतो, जो चोंगकिंगसह आश्चर्यकारक लँडस्केपमधून जातो. सांस्कृतिक खजिना जोडणारा निसर्गरम्य मार्ग!”

https://www.facebook.com/reel/8106238839422409

लिव्हिंग चायना नामक इंस्टाग्राम अकाउंटवर आम्हाला याच महामार्गाचा व्हिडिओ आढळला. 

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “हा महामार्ग चीनच्या चोंगकिंग नगरपालिकेतील फेंगजी काउंटीमध्ये आहे.”

युट्यूबवर सर्च केल्यावर “सन ऑफ चायना” नामक चॅनलने रोजी 12 जून रोजी फेंगजी काउंटीमधील अनलाई एक्सप्रेसवेचा एक व्हिडिओ शेअर केल्याचे आढळले.

व्हायरल व्हिडिओतील भव्य खांब, नदीवर पसरलेला कमान पूल आणि आणखी एक पूल खालील व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतो. 

हा धागा पकडून अधिकसर्च केल्यावर कळाले की, हा महामार्ग फेंगजी काउंटीमधील मेक्सी नदीवरील आहे.

गुगल मॅपवर या दोन पुलांची फोटो आहेत. तसेच त्यांचे बांधकाम दर्शविणारे काही फोटो येथे दाखवले आहेत.

अंकांग-लाइफेंग एक्सप्रेसवे

अंकांग-लाइफेंग एक्सप्रेसवे, ज्याला अनलाई एक्सप्रेसवे G6911 म्हणूनही ओळखले जाते. तसेच हा शानक्सी प्रांतातील अंकांग शहरातील शिटियन एक्सप्रेसवेवरील हुआंग्यांग इंटरचेंजपासून सुरू होते आणि हुबेई प्रांतातील लायफेंग काउंटीमधील लायफेंग इंटरचेंज येथे समाप्त होते. या एक्सप्रेसवेची लांबी 446.26 किलोमीटर आहे. अधिक माहिती येथे वाचू शकता.

महामार्ग क्र.14

मात्र महामार्ग क्र.14 जम्मू-काश्मीरमध्ये येत नाही. तो पश्चिम बंगालच्या मोरग्राममधील महामार्ग क्र.12  जंक्शनपासून सुरू होते आणि खरगपूरजवळील महामार्ग क्र.16 जंक्शनवर संपण्यापूर्वी रामपुरहाट, सिउरी, राणीगंज, बांकुरा, गरबेटा आणि सालबानी सारख्या शहरांमधून जातो. अधिक महिती येथे उपलब्ध आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ जम्मू आणि काश्मीरमधील महामार्गाचा नाही. मुळात हा व्हिडिओ चीनमधील G6911 अंकांग-लाइफेंग एक्सप्रेसवेच्या बांधकामाचा आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:चीनमधील एक्सप्रेसवे बांधकामाचा व्हिडिओ जम्मू–काश्मीरचा महामार्ग म्हणून व्हायरल

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: False