बिहारमध्ये भाजप महिला मोर्चाने साडीचे दुकान लुटले का? वाचा सत्य

False राजकीय | Political

राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईवर करण्यात आलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपने 4 सप्टेंबर रोजी बिहार बंदचे आवाहन केले होते. 

या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही महिला दुकानातून साड्या हिसकावून घेताना दिसतात. दावा केला जात आहे की, “काँग्रेसच्या विरोधात बिहारमध्ये बंद पुकारताना भाजप महिला कार्यकर्त्यांनी एक साड्याचे दुकान लुटले.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बिहारमधील नसून राजस्थानमधील आहे. या व्हिडिओचा भाजपशी काही संबंध नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एका साड्याच्या दुकानवर महिलांची झुंबड दिसते.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मोदींच्या आईला शिव्या दिल्या म्हणून बिहार बंद करून भाजपाच्या भक्तिनींनी साडीचं दुकान लुटलं.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ बिहारमधील भाजप मोर्चाशी संबंधित नाही.

अग्रवाल साडी नामक इन्स्टाग्राम पेजने 20 ऑगस्ट रोजी हाच व्हिडिओ शेअर केल्याचे आढळले.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “ हा अग्रवाल साड्यांच्या बिग सेलचा 60 वा दिवस आहे.”

https://www.instagram.com/reel/DNkhKs3xLi7/?utm_source=ig_web_copy_link

या पेजवर महिला दुकानात साडी खरेदी करण्यासाठी केलेल्या गर्दीचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहे. 

मूळ पोस्ट – इंस्टाग्राम

हेच व्हिडिओ अग्रवाल साडीजच्या युट्यूब चॅनलवरदेखील उपलब्ध आहेत.

मूळ पोस्ट – युट्यूब

अधिक सर्च केल्यावर कळाले की, अग्रवाल साडीज हे दुकान राजस्थानातील उदयपूर शहरातील मालदास स्ट्रीटवर आहे.

गुगल मॅपवर सर्च केल्यावर अग्रवाल साडीस दुकान आढळले. गुगल मॅपवरील उपलब्ध असलेले फोटो आणि व्हिडिओदेखील व्हायरल व्हिडिओ याच दुकानाचा असल्याची पुष्टी करतात.

मूळ – गुगल मॅप

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ बिहारमधील भाजप मोर्चाशी संबंधित नाही. मुळात हा व्हिडिओ राजस्थानातील उदयपूर येथील एका साडीच्या दुकानातील विक्रीचा आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:बिहारमध्ये भाजप महिला मोर्चाने साडीचे दुकान लुटले का? वाचा सत्य

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: False


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *