बिल गेट्स महाकुंभ मेळ्यात दाखल झाले नाही; काशीचा व्हिडिओ प्रयागराजचा म्हणून व्हायरल

False Social

प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरू झाला. याच पार्श्वभूमीवर बिल गेट्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “बिल गेट्स महाकुंभ मेळ्यासाठी दाखल झाले आहेत.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती बिल गेट्स नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दिसतो आणि बॅकग्राउंडमध्ये आवाज येतो की, हा व्यक्ती बिल गेट्स आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स सुद्धा या महाकुंभ मेळ्यासाठी दाखल झाले आहेत.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम बिल गेट्स प्रयागराजमध्ये येऊन महाकुंभ मेळ्यामध्ये दाखल झाले असते तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी कोणतीही बातमी अधिकृत माध्यमांवर आढळत नाही.

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ महाकुंभचा नाही, तसेच यामध्ये दिसणारी व्यक्ती बिल गेट्स नाही.

गुल्लक नामक युट्यूब चॅनलने हाच व्हिडिओ 24 डिसेंबर 2024 रोजी शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “बिल गेट्ससारखा दिसणारा माणूस.”

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती म्हणतो की, “हा व्हिडिओ काशी विश्वनाथ मंदिरचा आहे.”

आर्काइव्ह

पुढे अधिक सर्च केल्यावर व्हायरल व्हिडिओचा दुसऱ्या अँगलचा व्हिडिओ आढळला. ज्यामध्ये एक व्यक्ती म्हणतो की, “हा डुप्लिकेट बिल गेट्स आहे.”

आर्काइव्ह

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती बिल गेट्स नाही. तसेच हा व्हिडिओ महाकुंभ मेळ्यातील नसून बनासचामधील काशी विश्वनाथ मंदिरचा आहे. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:बिल गेट्स महाकुंभ मेळ्यात दाखल झाले नाही; काशीचा व्हिडिओ प्रयागराजचा म्हणून व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False