
माजी मुख्यमंत्री व शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. या ग्राफिक कार्डसोबत दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरेंनी बाबर हा देशासाठी शहीद झाला, असे म्हटले आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बनावट आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल ग्राफिकमध्ये सकाळचा लोगो आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो दिसतो.
सोबत ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “आज माझ्या मुस्लिम बांधवांसाठी दु:खाचा दिवस आहे.! बाबर हा देशासाठी शहीद झाला.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम उद्धव ठाकरेंनी असे कोणते वक्तव्य केले असते तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, ठाकरेंनी असे वक्तव्य केल्याचे कोणत्याही अधिकृत माध्यमांवर आढळत नाही.
तसेच सकाळच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटरवरदेखील व्हायरल ग्राफिक आढळले नाही.
या उलट सकाळच्या फेसबुक अकाउंटवर खालील प्रमाणे ग्राफिक कार्ड आढळले. या पोस्टमधील फोटो आणि लोगो एक सारखे आहे, परंतु, विधान वेगळे आहे.
या ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “सत्तास्थापनेच्या नाट्यामागे शिंदेंच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; उद्धव ठाकरेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ.”
सकाळचे खंडण
सकाळने 8 डिसेंबर रोजी फेसबुक पोस्ट शेअर करत व्हायरल ग्राफिक बनावट असून त्यांनी अशी कोणतीही बातमी जारी केलेली नसल्याचे स्पष्ट केले.
तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सकाळची हीच पोस्ट 8 डिसेंबर रोजी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केली.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल ग्राफिक बनावट असून सकाळद्वारे शेअर करण्यात आले नाही. तसेच उद्धव ठाकरेंनी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:उद्धव ठाकरेंनी ‘बाबर देशासाठी शहीद झाला,’ असे वक्तव्य केले नाही; बनावट ग्राफिक व्हायरल
Written By: Sagar RawateResult: Altered
