
अनंत पद्मनाभस्वामीची हिरेजडीत सुवर्ण मूर्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, ही मूर्ती 7.8 हजार किलो शुद्ध सोने आणि 780 कॅरेट हिऱ्यांनी बनवलेली 7.8 लाख हिरेजडीत 3 हजार वर्षांपूर्वीची आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील पद्मनाभस्वामीची मूर्ती शिवनारायण ज्वेलर्सने 2023 मध्ये तयार केली होती.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये पद्मनाभस्वामी यांच्या पोटावर ब्रम्हदेवाची छोटी मूर्ती आणि पाच तोंडी नाग दिसतो.
हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “३००० वर्षांहून अधिक जुनी अनंत पद्मनाभस्वामीची मूर्ती ७८०० किलो शुद्ध सोने, ७८०,००० हिरे आणि ७८० कॅरेट हिऱ्यांपासून बनलेली आहे.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील मूर्ती 3000 वर्षांपूर्वीची नाही.
कार्तिकनागराज नामक इंस्टाग्राम अकाउंटने हाच व्हिडिओ 6 ऑगस्ट 2023 रोजी शेअर केल्याचे आढळले.
कॅप्शनमध्ये दिलेल्या महितीनुसार, श्री अनंत पद्मनाभस्वामी मूर्तीची उंची 8 इंच आणि लांबी 18 इंच आहे. 2 महिने दररोज 16 तास काम करणाऱ्या 32 लोकांच्या हाताने बनवलेल्या या मूर्तीचे वजन तब्बल 2.8 किलोग्रॅम आहे.
या मूर्तीमध्ये एकूण 500 कॅरेटचे सुमारे 75,000 उच्च-गुणवत्तेच्या हिऱ्यांनी सुशोभित केले आहे. प्रत्येक हिरा विचारपूर्वक तयार केला असून कुशलतेने पॉलिश आणि सेट केला गेला आहे.
मूळ पोस्ट – इंस्टग्राम
पुढे, व्हायरल मूर्तीची व्हिडिओ शिवनारायण ज्वेलर्स प्रव्हेट लिमिटेड नामक इंस्टग्राम 23 डिसेंबर 2023 रोजी शेअर केला. या पोस्टनुसार, श्री अनंत पद्मनाभस्वामींची मूर्ती शिव नारायण ज्वेलर्सने बनवली होती. भीमा ज्वेलर्स, तिरुवनंतपुरमचे अध्यक्ष डॉ. बी. गोविंदन यांना समर्पित केली होती.
मूळ पोस्ट – इंस्टग्राम
खालील मुलाखतमध्ये शिव नारायण ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक तुषार अग्रवाल यांनी ही मूर्ती बनवण्यामागील कल्पना स्पष्ट केली.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील पद्मनाभस्वामीची मूर्ती 3000 वर्ष जुनी नाही. ही मूर्ती शिवनारायण ज्वेलर्सने 2023 मध्ये तयार केली होती. ही 18 इंचांची मूर्ती 18 कॅरेक्टर सोन्याने बनवली असून यामध्ये 2.8 किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. सुमारे 500 कॅरेट वजनाचे 75,089 नगांचे हिरे त्यात बसवले आहेत. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:व्हायरल व्हिडिओमधील पद्मनाभस्वामीची सुवर्ण मूर्ती 3000 वर्षांपूर्वीची नाही; वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: False
