तारापूर अणुऊर्जा केंद्रात रेडिएशन लीक झाले नाही; खोट्या दाव्यासह पत्रक व्हायरल

False Social

पालघर जिल्ह्यामधील तारापूर शहरातील अणुऊर्जा केंद्रात रेडिएशन लीक झाले, या दाव्यासह एक पत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे पत्रक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल पत्रक आपत्कालीन कवायतीचे (मॉक ड्रिल) आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल पत्रकमध्ये पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाला देलेले अर्ज दाखवले आहे. यामध्ये तारापूर अणुऊर्जा केंद्रातील अणभट्टीमध्ये किरणोत्सर्ग पसरवणाऱ्या रेडिओधर्मी पदार्थाची गळती झाली असून परिसरातील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

युजर्स हे पत्रक शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “अतिशय संवेदनशील मेसेज परिस्थितीचा गांभीर्य ओळखून वरील गावातील आपले नातेवाईक मित्रमंडळी यांना सावध करा आणि मेसेज फॉरवर्ड करा.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, तारापूर अणूऊर्जा केंद्रात रेडिएशन लीक झाले नव्हते.

सर्वप्रथम फॅक्ट क्रेसेंडोने तारापूर अणूऊर्जा केंद्राशी संपर्क साधल्यावर तेथील अधिकाऱ्याने व्हायरल दाव्याचे खंडण करत सांगितले की, “अणूऊर्जा केंद्रात रेडिएशन लीक झाले नव्हते.व्हायरल पत्रक 12 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आपत्कालीन कवायतीचा (मॉक ड्रिल) एक भाग होते. आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे कसे बाहेर पडावे यासाठी ही मॉक ड्रिल घेण्यात आली होती.”

खालील व्हायरल पत्रकामध्ये पहिल्या ओळीत “ऑफसाईट आपत्कालीन अभ्यासाकरिता” असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.

तारापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निवास कणसेंशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, “व्हायरल पत्रक तारापूर अणूऊर्जा केंद्राच्या मॉक ड्रिलचे आहे. यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्यासाठी अंदाजीत वेळेच्या तुलनेत प्रत्यक्षात किती वेळ लागतो आणि बचाव कार्यात कशी सुधारणा केली जाईल इत्यादी कार्याच्या आराखड्यात सुधारणा करण्यासाठी ही ड्रिल करण्यात आली होती.”

लोकसत्ताच्या बातमीनुसार तारापूर अणुऊर्जा केंद्राशी संबंधित आपत्कालीन कवायत अभ्यासासाठी सुरू असताना त्याअंतर्गत अधिकारी वर्गाला प्रसारित करण्यात आलेला संदेश नागरिकांपर्यंत सोशल मीडियावरुन पोहोचल्याने एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

परंतु, पालघर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गोविंद बोडके यांनी माध्यामांशी बोलतांना आफवांचे खंडण केले. त्यांनी सांगितले की, “व्हायरल दावा भ्रामक आहे. तारापूर अणुऊर्जा केंद्रात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्या चे भासवून बचाव कार्याची कवायत करण्यात आली होती.” अधिक माहिती येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, तारापूर अणूऊर्जा केंद्रात रेडिएशन लीक झाले नव्हते. व्हायरल पत्रक मॉक ड्रिलचे असून भ्रामक दाव्यासह व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:तारापूर अणुऊर्जा केंद्रात रेडिएशन लीक झाले नाही; खोट्या दाव्यासह पत्रक व्हायरल

Written By: Sagar Rawate  

Result: False