मुस्लिम व्यक्तीने तिरंग्याला विरोध केल्याचा स्क्रिप्टेड व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक एका दुकानावर राष्ट्रीय ध्वज लावताना दिसतात, तर त्या दुकानाचा मुस्लिम मालक तिरंगा लावण्यास विरोध करत असल्याचे दिसतो. या क्लिपला सांप्रदायिक संदर्भ देत अनेक युजर्सकडून शेअर करण्यात येत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे.

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक एका दुकानावर तिरंगा लावताना दिसतात. त्यावेळी दुकानाचा मुस्लिम मालक ध्वज लावण्यास विरोध करत असल्याचे दृश्य दाखवले आहे.

व्हिडिओवर लावलेल्या ग्राफिकमध्ये लिहिले आहे की, “विचार करण्यासारखी गोष्ट आहे, जे देशाचा झेंडा लावायला विरोध करतात. त्यांच्याकडून देशभक्तीची अपेक्षा न केलेलीच बरी.”

तसेच युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हिंदूंनो, या देशद्रोह्यांना वेळीच ओळखा.”

मूळ पोस्ट – इंस्टग्राम | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी रिव्हर्स इमेज सर्च करण्यात आला. त्यानंतर समोर आले की, व्हायरल होत असलेली क्लिप अर्धवट असून ती एका स्क्रिप्टेड व्हिडिओचा भाग आहे.

या व्हिडिओची पूर्ण आवृत्ती “रितिक कटारिया” या यूट्यूब चॅनलवर 14 ऑगस्ट 2023 रोजी अपलोड करण्यात आली आहे. 

पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर असे दिसते की, शेवटी व्हिडिओतील मुस्लिम पात्र सांगते की तिरंगा उंच ठिकाणी लावला पाहिजे, जेणेकरून त्याचा योग्य मान राखला जाईल. त्यानंतर तो आपल्या दुकानावर ध्वज लावलेला दाखवतो.

याशिवाय, व्हिडिओच्या डिस्क्लेमरमध्येही स्पष्टपणे नमूद केले आहे की, “हा व्हिडिओ जनजागृती, शिक्षण आणि सामाजिक चिंतनासाठी तयार केलेला काल्पनिक सादरीकरण आहे. व्हिडिओतील सर्व पात्रे आणि प्रसंग नाट्यमय स्वरूपात लिहिलेले असून त्यांचा कोणत्याही प्रत्यक्ष व्यक्तीशी संबंध नाही.”

मूळ पोस्ट – युट्यूब 

या यूट्यूब चॅनलवर अशा प्रकारचे अनेक स्क्रिप्टेड सामाजिक संदेश देणारे व्हिडिओ अपलोड केलेले आढळतात.

मूळ पोस्ट – युट्यूब

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत क्लिप अर्धवट असून ती एका स्क्रिप्टेड व्हिडिओमधील भाग आहे. मुळ व्हिडिओमध्ये तिरंगा उंच ठिकाणी लावून त्याचा आदर राखावा, असा संदेश दिला आहे. त्यामुळे तिरंग्याचा अपमान केल्याचा दावा चुकीचा आहे. खोट्या सांप्रदायिक  दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Result Stamp

Title: मुस्लिम व्यक्तीने तिरंग्याला विरोध केल्याचा स्क्रिप्टेड व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल

Fact Check By: SAGAR RAWATE

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *