
सोशल मीडियावर एका व्हिडिओसोबत नावा केला जात आहे की, “सलूनमध्ये न्हाव्याकडून मानेचा मसाज करून घेताना मेंदूला रक्त पुरवठा करणारी नस दबल्या गेली आणि ग्राहकाचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यु झाला.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये मालिश करताना ग्राहक बेशुद्ध होताना दिसतो.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “केस कापून झाल्यावर डोक्याचा पाठीचा मसाज करून झाल्यावर मान वाजवताना मेंदूला रक्त पुरवठा करणारी नस दबल्याने ब्रेन स्ट्रोक आल्याने मृत्यु.”
https://archive.org/details/scrnli_3fdJbv9PPqhTFV
मूळ पोस्ट – इंस्टाग्राम | फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर हाच व्हिडिओ ‘थर्ड आय’ नामक युट्यूब चॅनलवर 13 नोव्हेंबर रोजी शेअर केल्याचे आढळले.
वर्णनमध्ये लिहिले होते की, या युट्यूब चॅनलवर असणारे सर्व व्हिडिओ स्क्रिप्टेड असून लोकांना जागृत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
मूळ पोस्ट – थर्ड आय
कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड, ड्रामा आणि पॅरोडी असून जनजागृतीच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे.”
व्हिडिओच्या शेवटी डिस्क्लेमरदेखील देण्यात आले की, “हे चॅनल लोकांना वेगवेगळ्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी आणि मनोरंजनासाठी लघुपट बनवते.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड असून मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:सलूनमध्ये मसाज करताना ग्राहकाचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यु झाला नाही; व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड
Written By: Sagar RawateResult: False
