
सोशल मीडियावर शाळकरी विद्यार्थांचा एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, ती मुले ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत होते.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये शाळकरी मुले ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत नव्हते. पोलिसांच्या तपासानुसार ती मुले ‘बहादूर खान जिंदाबाद’ असे म्हणत होते.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये काही शाळकरी विद्यार्थी घोषणा देताना दिसतात.
व्हिडिओच्या ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “धक्कादायक ! शाळकरी मुलांकडून अकोल्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे.”
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “शालेय मुलांच्या मनात द्वेष प्रेरणं अत्यंत धक्कादायक आहे.”
तथ्य पडताळणी
‘न्यूज-18 लोकमत’ने 6 डिसेंबर रोजी व्हायरल व्हिडिओ संबंधित एक बातमी शेअर केली की, अकोला पोलिस विभागाने या प्रकरणाची दखल घेतली आणि तपासात हा व्हिडिओ तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक गावाचा असल्याचे आढळले.
खालील व्हिडिओमध्ये हिरवखेड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन राठोड सांगतात की, व्हायरल व्हिडिओमधील मुले 5 ते 8 वयाचे असून आम्ही त्यांची विचारपूस केली. मुलांनी सांगितले की, आमच्यातील एका मित्राच्या आजोबाचे ‘बहादुर खान’ आहे. त्या मुलाला चिडवण्यासाठी आम्ही ‘बहादुर खान जिंदाबाद’च्या घोषणा देत होतो. एकंदरीत व्हायरल व्हिडिओ लक्षपूर्वक कमी आवाजात ऐकल्यावर आपल्याला ‘बहादुर खान जिंदाबाद’ अशा घोषणा ऐकू येतील.
‘साम टीव्ही’ने 6 डिसेंबर रोजी प्रसारित केलेल्या बातमीत व्हिडिओतील मुले सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांनी घोषणेबाबत खरी माहिती देताना दिसतात.
यामध्ये ते सांगतात की, ‘आमच्या मित्राच्या आजोबाचे ‘बहादुर खान’ असून त्याला चिडवण्यासाठी आम्ही ‘बहादुरखा जिंदाबाद’च्या घोषणा देत होतो.’
अधिक महिती येथे वाचू शकता.
पोलिसांचे खंडण
पुढे अधिक महितीसाठी हिवरखेड पोलिस ठाण्याशी संपर्क साधल्यावर तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, “व्हायरल व्हिडिओमधील मुले ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत नव्हते. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील मुलांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या नव्हत्या. ती मुले त्यांच्यातील एका मुलाला त्याच्या आजोबाच्या नावाने चिडवण्यासाठी ‘बहादूर खान जिंदाबाद’ म्हणत होते.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
Title:FACT-CHECK: अकोल्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या का?
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading


