
शालेय शिक्षण विभागद्वारे ‘महावाचन उत्सव’चे एक प्रशस्तीपत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दावा केला जात आहे की, शालेय शिक्षण विभागातर्फे असंख्य चुका असलेले प्रशस्तिपत्रक विद्यार्थ्यांना देण्यात आले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रिनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल प्रशस्तीपत्र बनावट असून शालेय शिक्षण विभागातर्फे जागी केलेले नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल प्रशस्तिपत्रकात लाल रेखा नमुद करत लिखाणातील असंख्य चुका दाखले आहेत.
स्क्रिनशॉटमध्ये लिहिले होते की, “हे महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याचे प्रशस्ती पत्र वाचा, त्यातील मराठी वाचून भोवळ येईल.”
तथ्य पडताळणी
कीवर्ड सर्च केल्यावर व्हायरल स्क्रिनशॉट संदर्भात दैनिक प्रभातने 27 सप्टेंबर 2024 रोजी शेअर केलेली बातमी आढळली.
यामध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी माध्यमात व्हायरल होत असलेला दावा खोटा असून शालेय शिक्षण विभागातर्फे दिलेले प्रशस्तिपत्रक अचूक असल्याचे स्पष्ट केले.
मूळ पोस्ट – दैनिक प्रभात | आर्काइव्ह
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने 27 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर ‘महावाचन उत्सव 2024’चे खरे प्रशस्तीपत्र शेअर केले.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यात ‘महावाचन उत्सव 2024’ राबविण्यात येत आहे. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रशस्तीपत्र देण्यात येते. विभागाच्या https://mahavachanutsav.org या संकेतस्थळावर हे प्रशस्तीपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा असून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मान्य केलेले आणि विभागाने उपलब्ध करून दिलेले हे प्रशस्तीपत्र अचूक असल्याची माहिती राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिली आहे.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल प्रशस्तीपत्र बनावट असून शालेय शिक्षण विभागातर्फे जागी केलेले नाही. मुळ प्रशस्तीपत्रमध्ये शब्दांची फेरफार करुन चुकीच्या दाव्यासह पसरवले जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:शालेय शिक्षण विभागद्वारे वाटलेल्या ‘महावाचन उत्सव’च्या प्रशस्तिपत्रकात चुका नाही; बनावट पत्रक व्हायरल
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Altered
