सिद्धीविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केला नाही; सकाळच्या नावाने बनावट ग्राफिक व्हायरल

Altered राजकीय | Political

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळ वृत्तपत्राचे एक ग्राफिक कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, मुंबईमधील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा ठोठावला आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक कार्ड बनावट असून अशी कोणतीही बातमी सकाळने दिलेली नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल ग्राफिकमध्ये सकाळ वृत्तपत्राचा लोगो आणि सिद्धीविनायक मंदिराचा फोटो दिसतो. ग्राफिकमध्ये लिहिले आहे की, “मुंबईतील सिद्धि विनायक मंदिरावर ही वक्फ बोर्डचा दावा.”

युजर्स हे ग्राफिक कार्ड शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हिंदूचे आराध्य व मुंबईची ओळख असलेल्या सिद्धीविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाचा दावा! महाविकास आघाडीने उलेमांच्या मागण्यांवर लेखी संमतीपत्र दिलेले आहे, त्यात वक्फ बद्दल सुद्धा मागणी आहे. मंदिरे, गडकिल्ले वाचवायचे असतील तर महायुतीला मत द्या!”

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम कीव्हर्ड सर्च केल्यावर “सिद्धि विनायक मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केला” अशी बातमी अधिकृत माध्यमांवर आढळत नाही. तसेच सकाळनेही अशी बातमी दिल्याचे आढळत नाही. 

या उलट सकाळने 18 नोव्हेंबर रोजी फेसबुक पेजवर हे ग्राफिक कार्ड फेक असल्याचे सांगितले.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “सध्या सोशल मीडियावर ‘मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावरही वक्फ बोर्डचा दावा’ नावाने एक दिशाभूल करणारे क्रिएटिव्ह ‘सकाळ’च्या नावाने व्हायरल करण्यात आलं आहे. मात्र असं कोणतंही क्रिएटिव्ह ‘सकाळ’ने तयार केलं नसून यात ‘सकाळ’च्या क्रिएटिव्हशी मिळतंजुळतं टेम्प्लेट आणि लोगो वापरून काही लोकांनी हा खोडसाळपणा केला आहे.”

https://www.facebook.com/share/p/18mqW48EHU

सिद्धि विनायक मंदिर व्यवस्थापकांचे खंडण

श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या संस्थेचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी व्हायरल दाव्याचे खंडण करत माध्यमांना सांगितले की, “श्रीसिद्धिविनायक मंदिरावर कोणीही दावा केलेला नाही.” संपूर्ण बातमी येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हायरल ग्राफिक कार्ड खोटे असून सकाळ द्वारे जारी करण्यात आलेले नाही. तसेच सिद्धिविनायक मंदिराच्या संस्थेचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी व्हायरल दावा खोटा असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हे खोटे ग्राफिक व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:सिद्धीविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केला नाही; सकाळच्या नावाने बनावट ग्राफिक व्हायरल

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Altered