पटियालामधील दुकानांच्या तोडफोडचा जुना व्हिडिओ शेतकरी आंदोलनाच्या नावाने व्हायरल

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

सध्या पिकांच्या किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील हजारोच्या संख्येने आंदोलक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर  धडकल्यामुळे तेथे नाकाबंदी करण्यात आली आहे.

या पर्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही शीख समाजाचे लोक दुकानात घुसून तोडफोड करत आहे आणि पोलिस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. 

दावा केला जात आहे की, शेतकरी आंदोलनादरम्यान ही तोडफोड करण्यात आलेली आहे.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडओ शेतकरी आंदोलनाशी संबंधित नाही. हा व्हिडिओ पटियालामध्ये 2 वर्षांपूर्वी झालेल्या दोन गटांमधील संघर्षाचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक शीख समाजाचा गट हातात तलवार व काठ्या घेऊन तोडफोड करत असताना पोलिस त्यांना रोखत असल्याचे दिसते.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हे बघा शेतकरी आंदोलन.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ पंजाबमधील पटियाला शहराचा आहे.

पत्रकार शुभांगी शर्मा यांनी हाच व्हिडिओ 30 एप्रिल 2022 रोजी ट्विटरवर शेअर केला होता. व्हिडिओ सोबत महिती दिली आहे की, “हा व्हिडिओ पटियालाचा आहे. एका हिंदू मंदिरावर खलिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला.”

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, पंजाबमधील शिवसेनेचे (बाळ ठाकरे) 15 गट आहेत. त्यापैकी एका गटाचे कार्याध्यक्ष म्हणून हरीश सिंगला हे काम बघत होते. सिंगल यांनी 29 एप्रिल 2022 रोजी कथितपणे “खलिस्तान मुर्दाबाद” मोर्चाचे नेतृत्व केले होते. परिणामी दुख निवारन साहिब गुरुद्वारातील निहंग शीख आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांची काली माता मंदिर जवळ हाणामारी झाली होती. या दंगलीनंतर शिवसेनाने हरीश सिंगला आणि इतर काही कार्यकर्यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. अधिक महिती येथे वाचू शकता.

तसेच एएनआयने या दंगलीचा आनखी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये पोलिस दोन्ही गटामधील संघर्ष आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षणात येईल की, व्हायरल व्हिडिओमध्ये आणि एएनआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही ठिकाणी एक पिवळी रंगाची पगडी व लाल रंगाचे टी – शर्ट परिधान केलेला व्यक्ती दिसतो.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडओ शेतकरी आंदोलनाशी संबंधित नाही. हा व्हिडिओ पटियालामध्ये 2 वर्षांपूर्वी झालेल्या दोन गटामधील संघर्षाचा आहे. खोट्या दाव्यासह व्हिडिओ शेअर केला जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पटियालामधील दुकानांच्या तोडफोडचा जुना व्हिडिओ शेतकरी आंदोलनाच्या नावाने व्हायरल

Written By: Sagar Rawate 

Result: Misleading