उद्धव ठाकरेंनी काँग्रेस उमेदवारांना पाडण्याचे आदेश दिले नाही; फेक ग्राफिक व्हायरल

Altered राजकीय | Political

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिण मतदार संघातील शिवसेना गटाच्या विरोधात उभे असलेले उमेदवार धर्मराज काडदी यांना पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाने कथितरित्या नाराजी व्यक्ती केली.

या पार्श्वभूमीवर एबीपी माझाचे एक ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. या ग्राफिकमध्ये दावा केला जात आहे की, “उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना विधानसभा निवडणूकीमध्ये काँग्रेस उमेदवारांना पाडाण्याचे आदेश दिले.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक बनावट आहे.

काय आहे दावा ?

या ग्राफिकमध्ये लिहिले आहे की, “सोलापुरमध्ये झालेल्या विश्वासघातामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आदेश दिला की, जिथे काँग्रेसचे उमेदवार असतील त्यांना पाडा.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्व प्रथम उद्धव ठाकरेंनी अशी कोणती घोषणा केली असती तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी कोणतीही बातमी अधिकृत माध्यमांवर आढळत नाही.

या उलट एबीपी माझाने 20 नोव्हेंबर रोजी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर व्हायरल ग्राफिक फेक असल्याचे स्पष्ट केले.

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “एबीपी माझाच्या नावे विविध विधानसभा मतदारसंघात खोट्या इमेज/स्क्रीनशॉट व्हायरल केले जात आहेत. त्याचा एबीपी माझाशी काहीही संबंध नाही. या प्रकाराबाबत एबीपी माझा कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलत आहे.”

ठाकरे गटाचा विरोध

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरमध्ये खासदार प्रणिती शिंदे विरोधात आंदोलन केले.

तसेच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदेंची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल ग्राफिक बनावट असून एबीपी माझाद्वारे जारी करण्यात आले नाही. विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर खेटे ग्राफिक व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:उद्धव ठाकरेंनी काँग्रेस उमेदवारांना पाडण्याचे आदेश दिले नाही; फेक ग्राफिक व्हायरल

Written By: Sagar Rawate  

Result: Altered